शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १३४ स्कूल बसेसचे परवाने रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:38 IST

१३४ स्कूल बसेसचा परवाना २ महिन्यांसाठी रद्द केल्याच्या नोटीस संबंधित संस्थांना पाठविण्यात येत आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुरक्षित प्रवासासाठी जिल्ह्यातील स्कूल बसेसची फेरतपासणी करण्यासाठी निर्धारित मुदतीत आरटीओ कार्यालयात दाखल न झालेल्या स्कूल बसेसचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १४३ पैकी केवळ ९ स्कूल बस फेरतपासणीसाठी आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १३४ स्कूल बसेसचा परवाना २ महिन्यांसाठी रद्द केल्याच्या नोटीस संबंधित संस्थांना पाठविण्यात येत आहेत.  उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ७ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी स्कूल बस मालकांनी स्कूलबस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबिरात प्रपत्र अ नुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी आणि तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या होत्या. जिल्ह्यात १४३ स्कूल बसेस आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूल बसेसची तपासणी करण्याची मागणी पालकांनी केली होती. स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाचा परवाना निलंबन केला जाईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला होता. आता निर्धारित मुदतीत केवळ ९ स्कूल बस फेरतपासणीसाठी दाखल झाल्या असून, उफेरतपासणीसाठी न आणलेल्या १३४ स्कूलबसेसचा परवाना २ महिन्यांसाठी रद्द करण्यात आला असून, या संदर्भातील नोटीस संबंधित स्कूलबसचे मालक आणि संस्थांना पाठविण्यात येत आहेत. दरम्यान, यानंतरही फेर तपासणी न केलेले वाहन रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस