शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

१७ पैकी १३ प्रकल्प कोरडेठण्ण !

By admin | Updated: May 7, 2017 19:26 IST

१७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे.

रिसोड : तालुक्यातील १७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे. केवळ दोन प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे. यंदा जिल्हाभरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या दाहकतेचा सर्वाधिक फटका रिसोड तालुक्यात दिसून येत आहे. भूगर्भातील पाणी पातळी देखील कमालीची खालावल्याने विहीरी, हातपंप, कूपनलीका आटल्या आहेत. त्यामुळे रिसोड शहरासह ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पावसाळ्याला अजून बराच अवधी असल्याने भविष्यात पाणी समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे.  निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी नाल्यासह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडतात. २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र, प्रकल्प परिसरात पाऊस समाधानकारक नसल्याने प्रकल्पातील जलसाठयात म्हणावी तशी वाढ झाली नव्हती. आता तर तब्बल १३ प्रकल्प कोरडेठण्ण असून, दोन प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहोचला आहे. जलपातळी खालावल्याने आणि जलाशयांमध्ये जलसाठा नसल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. तालुक्यातील नागरिकांना उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके असह्य करून सोडत आहेत. पाणीटंचाईच्या आगीत नागरिक होरपळत असतानादेखील संबंधित प्रशासन ठोस उपाययोजना करीत नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे.