शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘फिट इंडिया’त वाशिम जिल्ह्यातील ११४० शाळा  ‘अनफिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 11:36 IST

Fit India आतापर्यंत २८३ शाळांची नोंदणी झाली असून, ११४० शाळांची नोंदणी होणे बाकी आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : फिट इंडिया मोहिमेंतर्गत वाशिमसह राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. आतापर्यंत २८३ शाळांची नोंदणी झाली असून, ११४० शाळांची नोंदणी होणे बाकी आहे. मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र शासनाने फिट इंडिया ही मोहीम हाती घेतली आहे. शारीरिक सृदृढतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरावर घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापनविषयक माहिती संकेतस्थळावर किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे भरण्यात यावी आदी उद्देश यशस्वी व्हावे याकरिता फिट इंडिया मोहिमेंतर्गत सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांची नोंदणी शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. तसेच खेलो इंडियाच्या अ‍ॅपवर पहिली ते बारावीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकाला नोंदणी करणे आवश्यक आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी या कामासाठी एका सहायक शिक्षकाची नियुक्ती करावी, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे संचालक राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या आहेत. जिल्ह्यात शारीरिक शिक्षकाची अद्याप नोंदणी झाली नसून २८ डिसेंबर २०२० ही अंतिम मुदत आहे तर दुसरीकडे शाळांची नोंदणी करण्यासाठी २७ डिसेंबर अशी अंतिम मुदत आहे. आतापर्यंत १४२३ पैकी २८३ शाळांची नोंदणी झाली असून, ११४० शाळांची नोंदणी बाकी आहे.

फिट इंडिया मोहिमेंतर्गत शाळा व शारीरिक शिक्षकांनी नोंदणी करण्यासंदर्भात जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. तांत्रिक अडचणी येत असल्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले. शारीरिक शिक्षकांची नोंदणी अधिक व्हावी याकरिता प्रशिक्षकांची मदतही घेतली जात आहे.- चंद्रकांत उपलवार, जिल्हा क्रीडा अधिकारी

फिट इंडिया मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शाळांची नोंदणी केली जात आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापक, प्राचार्यांना सूचना दिलेल्या आहेत. नाेंदणी करण्यासंदर्भात लिंकही संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांना पाठविण्यात आली आहे. नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा