शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात १.१० लाख बालकांना पोलिओ डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:32 IST

Washim News ३ फेब्रुवारीपर्यंत १.२० लाखांपैकी १.१० लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला.

वाशिम  : जिल्ह्यात ३१ जानेवारीपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, ३ फेब्रुवारीपर्यंत १.२० लाखांपैकी १.१० लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. बुथवर न आलेल्या ग्रामीण भागातील बालकांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिओचा डोस दिला जाणार आहे.जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली. पहिल्या दिवशी ० ते ५ वर्षे वयोगटातील एक लाख २० हजार ७९९ पैकी एक लाख सात हजार ६६७  बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. बुथवर न आलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी ग्रामीण भागामध्ये २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान आणि शहरी भागामध्ये २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान घरोघरी जावून सर्वेक्षण केले जात आहे. याकरिता ग्रामीण भागात १६३४ तर शहरी भागात ८१ असे एकूण १ हजार ७१५ चमू कार्यरत आहेत. दोन दिवसात जवळपास तीन हजार बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. वीट भट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यांमधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २२ व शहरी भागात ८ अशा एकूण ३० मोबाईल टीम कार्यरत आहेत.

 जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी बुथवर न आलेल्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी ग्रामीण भागात २ ते ४ फेब्रुवारी आणि शहरी भागात २ ते ६ फेब्रुवारी या दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील ज्या बालकांना अद्याप पोलिओ डोस मिळाला नसेल तर पालकांनी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य