शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुल्यांकनात अनुदानास पात्र माध्यमिक शाळांचे ११ प्रस्ताव प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:35 IST

११ माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर करण्यास विलंब झाल्याने ते विहित मुदतीत सादर झाले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्षेत्रीय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांपैकी २०१४-१५ मध्ये झालेल्या मुल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांचे प्रस्ताव १० फेब्रूवारीपर्यंत सादर करण्याचे शिक्षण संचालकांचे निर्देश होते; मात्र जिल्ह्यातील ११ माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर करण्यास विलंब झाल्याने ते विहित मुदतीत सादर झाले नाहीत; तर प्राथमिक शाळांचे सर्व प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ३ फेब्रूवारीला बैठक झाली. त्यात क्षेत्रीय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांपैकी मुल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांचे प्रस्ताव १५ फेब्रूवारीपर्यंत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुषंगाने शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी ६ फेब्रूवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून प्रलंबित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्रस्ताव १० फेब्रूवारीपर्यंत सादर करावे. त्यानंतर येणारे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. असे असताना १० फेब्रूवारीपर्यंत जिल्ह्यातील ११ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्रस्तावांमधील त्रुटी दूर झाल्या नसल्याने सदर प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली. याप्रती शिक्षण वर्तुळातून नाराजीचा सूर उमटत आहे.

शिक्षण संचालनालयाकडून त्रुटीत काढण्यात आलेल्या प्रस्तावांची तपासणी केली जात आहे. त्रुटी दूर करून येत्या दोन दिवसांत प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात येतील.- तान्हाजी नरळेमाध्यमिक शिक्षणाधिकारीजिल्हा परिषद, वाशिम२०१४-१५ मध्ये मुल्यांकन झालेल्या तथा अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांचे सुधारित प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आले आहेत.- अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारीजिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र