शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १००० अपात्र शिधापत्रिका रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:42 IST

७७५ स्वस्त धान्य दुकानांतून ई-पॉसद्वारे वितरण : रोख पोवती घेण्याचे आवाहन

ठळक मुद्देधान्य वितरणातील अनियमितता व इतर वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यातील ८ रास्तभाव दुकाने रद्द करण्यात आली आहेत. अन्न दिनादिवशी बंद असलेल्या एकूण ११३ रास्तभाव दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ किरकोळ केरोसीन परवाने रद्द करण्यात आले आहेत, तसेच ५ किरकोळ केरोसीन परवान्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आली आहे.

वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरणामुळे जिल्ह्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य व केरोसीन वितरीत करण्यात येत असून,  अपात्र ठरलेल्या एक हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार, १५ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनील देशमुख, निरीक्षण अधिकारी नीलेश राठोड आदी उपस्थित होते.वानखेडे म्हणाले, जिल्ह्यात सर्व ७७५ स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे वितरण सुरु झाले आहे. याकरिता शिधापत्रिका व आधारकार्ड लिंकिंग करण्यात आल्याने बोगस शिधापत्रिका शोधण्याच्या कामाला गती मिळाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १००० शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून रद्द केलेल्या शिधापत्रिकाधारकांऐवजी पात्र लाभार्थ्यांचा समावेश त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व योजनांचे गहू व तांदूळ याचे मासिक नियतन ६३५५ मे. टन एवढे असून ई-पॉस मशीनमुळे आॅक्टोंबर २०१८ अखेरपर्यंत अन्नसुरक्षा योजनेतील ३३३ मे. टन धान्य तर शेतकरी लाभार्थी कुटुंबातील १२०० मे. टन धान्याची अशी एकूण १५३३ मे. टन धान्याची बचत झाल्याचा दावाही त्यांनी केला.जिल्ह्यात गॅस स्टँपिंग मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांकडे गॅस जोडणी आहे, त्यांचा केरोसीन कोटा बंद करण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान गॅस जोडणी उपलब्ध असूनही चुकीचे हमीपत्र सादर करणाºया लाभार्थ्यांविरुध्द कार्यवाही करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. जानेवारी २०१८ मध्ये जिल्ह्याला शासनाकडून ६ लाख ४८ हजार लिटर केरोसीनचे नियतन मंजूर झालेले आहे. ते आजरोजी ७२ हजार लिटर एवढे आहे, असेही ते म्हणाले.

८ रेशन दुकाने रद्द

धान्य वितरणातील अनियमितता व इतर वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यातील ८ रास्तभाव दुकाने रद्द करण्यात आली आहेत. तसेच अन्न दिनादिवशी बंद असलेल्या एकूण ११३ रास्तभाव दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ किरकोळ केरोसीन परवाने रद्द करण्यात आले आहेत, तसेच ५ किरकोळ केरोसीन परवान्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आली आहे.

रोख पावती घेण्याचे आवाहनसर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्तभाव दुकानातून अन्नधान्य व केरोसीन घेत असताना दुकानदाराकडे रोख पावतीचा आग्रह धरावा. रोखपावती घेतल्याशिवाय अन्नधान्य अथवा केरोसीन घेवू नये, असे आवाहनही त्यांनी  केले.

टॅग्स :washimवाशिमMaharashtraमहाराष्ट्र