शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

दीड एकरात मिरचीचे १०० क्विंटल उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:24 IST

यामाध्यमातून साधारणत: ३ लाख रुपये मिळाल्याची माहिती शेतकरी बोरकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात एक अक्षरी नाव असलेल्या टो या गावातील शेतकरी शिवाजी बोरकर या युवा शेतकऱ्याने आपल्या अवघ्या दीड एकर शेतात १०० क्विंटल मिर्ची पिकविण्याची किमया साध्य करून दाखविली. वाशिमच्या बाजारात मिर्चीला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. यामाध्यमातून साधारणत: ३ लाख रुपये मिळाल्याची माहिती शेतकरी बोरकर यांनी दिली.यासंदर्भात अधिक माहिती देताना शेतकरी बोरकर यांनी सांगितले, खरीप हंगामातील सोयाबिनची काढणी झाल्यानंतर दीड एकर शेतात डिसेंबर महिन्यात मिर्ची रोपांची लागवड केली. उच्च प्रतीचे बियाणे, खत, पाणी यासह इतर अत्यावश्यक बाबींचे योग्य नियोजन केल्याने फेब्रूवारी महिन्याच्या प्रारंभीपासूनच मिर्चीची तोड सुरू झाली. यामाध्यमातून आतापर्यंत चारवेळा मिर्चीची तोड करून सुमारे १०० क्विंटल मिर्चीची वाशिमच्या बाजारपेठेत विक्री केली. आणखीनही ५० क्विंटलच्या आसपास मिर्ची झाडाला शिल्लक असून दीड लाख रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी बोरकर यांनी व्यक्त केली.

दीड एकरातच १५ क्विंटल सोयाबिनचेही उत्पन्नटो येथील शेतकरी शिवाजी बोरकर याने खरीप हंगामात दीड एकरच क्षेत्रातून तब्बल १५ क्विंटल सोयाबिनचेही उत्पादन घेतले, हे विशेष. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून उत्पन्न घेत राहायला हवे, असा सल्ला शेतकरी बोरकर यांनी यानिमित्ताने दिला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी