शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

१ लाख २५ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात येणार खिचडीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:16 IST

1 lakh 25 thousand students will get the amount of khichdi : उन्हाळ्यात शाळांना सुटी असली तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शालेय पोषण आहार योजनेंतर्गत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिजवलेल्या आहाराऐवजी धान्य वितरित करण्यात आले. यंदाच्या उन्हाळी सुटीतील पोषण आहार धान्याचे वितरण झाले नसून, आता या कालावधीतील पोषण आहाराच्या धान्याऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पोषण आहाराची रक्कमच जमा केली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख २५ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे.उन्हाळ्यात शाळांना सुटी असली तरी सुटीच्या कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक असते. त्यातच यंदा शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वितरित करण्यात आले, तर उन्हाळ्यात धान्य वाटपही करणे शक्य झाले नाही. आता या आहाराचे पैसे थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात टाकले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती तयार ठेवण्यात यावी, ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शुक्रवार २५ जून रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ११२० शाळांतील १ लाख २५ हजार १८५ विद्यार्थ्यांच्या खात्यात उन्हाळी सुटीतील पोषण आहाराची रक्कम जमा होणार आहे. 

प्रति विद्यार्थी २०० ते ३०० रुपयेउन्हाळी सुटीत पोषण आहाराचे धान्य वितरित करणे शिक्षण विभागाला शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता या कालावधीतील पोषण आहार धान्य वितरणाऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट या आहाराची रक्कमच जमा करण्यात येणार असून, या योजनेंतर्गत प्रती विद्यार्थी २०० ते ३०० रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. त्यातच यंदाही शाळा ऑनलाईनच असून, २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील पोषण आहाराऐवजी धान्य मिळणार की डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात पोषण आहाराची रक्कम जमा होणार, याबाबत संभ्रम कायम आहे.

उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांना पोषण आहारातील धान्याचे वितरण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात या कालावधीतील पोषण आहाराची रक्कम जमा करण्याचे ठरले आहे. अद्याप यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. तथापि, शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या उपलब्ध आधार लिंक बँकखात्याची पडताळणी क रण्यासह खाते नसलेल्या विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याबाबत पालकांना सुचना देण्यात येणार आहेत.- गजाननराव डाबेराव,प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा