शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. माजी सदस्याच्या सधन मुलाला गरिबांसाठीच्या घरकूल योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:36 IST

Home News : याविरोधात पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर पंचायत समितीने विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते.

पालघर : जिल्हा परिषदेच्या एका माजी सदस्यांच्या सधन असलेल्या मुलाला कोंढाण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र संखे यांनी बेकायदेशीररीत्या घरकूल योजनेचा लाभ दिल्याने गरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असलेल्या योजनेचा दुरुपयोग केला गेला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी घेऊन ग्रामसेवक संखे आणि केंद्र प्रमुख ईश्वर दळवी यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्याकडील शासन निर्णयाप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कोंढाण ग्रामपंचायत हद्दीतील २०१५ च्या प्राधान्य यादीतील पात्र लाभार्थ्यांची वर्गवारी ग्रामसभेत करण्यात आली होती. ग्रामसभेत घेतलेल्या ठरवानुरूप इतर संवर्गातून २५ तर अनुसूचित जमाती संवर्गातील यादीमधून ५० लाभार्थी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार इतर संवर्गातील यादीतून अमोल अच्युत पाटील यांना पात्र म्हणून निवड करण्यात आली होती. ग्रामविकास अधिकारी संखे व क्षेत्रीय अधिकारी यांनी प्राधान्यक्रम यादीतील पात्र लाभार्थ्यांची प्रत्यक्षात घर व जमिनीची खात्री करून जागा स्वतःची असल्याबाबत अहवाल पंचायत समितीकडे देण्यात आला होता. त्यामुळे सदरचा अहवाल ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविल्यानंतर तो मंजूर करण्यात आला होता. पंचायत समिती सदस्य महेंद्र अधिकारी यांनी ही बाब माहितीच्या अधिकाराखाली समोर आणली आहे.प्राधान्यक्रम यादीनुसार लाभार्थी पाटील यांचे घरकुलाचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांचे घर व नवीन बांधकामाच्या ठिकाणाच्या जिओ टॅगिंग करण्यात आले होते. ग्रामपंचायतमधील आकारणी नोंदवही नमुना ८ मध्ये सदर लाभार्थ्यांच्या नावे २००५-०६ पर्यंत झोपडी असल्याची नोंद असून त्यानंतर २०१९-२० पर्यंत झोपडी किंवा विटा माती इमारत अशी नोंद आहे. त्यामुळे एका सधन असलेल्या व्यक्तीला घरकुल योजनेचा लाभ दिल्याची गंभीर बाब समोर आली होती. याविरोधात पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर पंचायत समितीने विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सदर घरकुल चुकीचे वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवून ते रद्द करीत ग्रामविकास अधिकारी संखे आणि केंद्र प्रमुख दळवी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. अहवालात ठपका पंचायत समिती सभेत विचारणा झाल्यावर विस्तार अधिकारी विनोद पाटील आणि अविनाश उराडे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सदर घरकुल चुकीचे वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. 

टॅग्स :Homeघरpalgharपालघर