जि.प.च्या इंग्रजी शाळा राहणार सुरू

By Admin | Updated: May 12, 2017 01:25 IST2017-05-12T01:25:28+5:302017-05-12T01:25:28+5:30

गरिबाच्या विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये शिकणे शक्य नसल्याने ठाणे जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर जिल्हा परिषद शाळामध्ये

ZP continued to remain in English school | जि.प.च्या इंग्रजी शाळा राहणार सुरू

जि.प.च्या इंग्रजी शाळा राहणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : गरिबाच्या विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये शिकणे शक्य नसल्याने ठाणे जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर जिल्हा परिषद शाळामध्ये इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या. गेली ६ ते ७ वर्षे या शाळा सुरू असून प्रतिसादही चांगला मिळत होता व मोफत इंग्रजी शिक्षण मिळत असतांना अचानक आगामी वर्षात या शाळा सुरू करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. यांचा फटका ग्रामीण भागातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा यांना बसणार होता. पालकांनी याबाबत निवेदन देऊन या शाळा कायम सुरू राहाव्यात अशी मागणी केली या पालकाच्या सुचनेचा गांभिर्याने विचार केल्याने जिल्हा परिषद पालघरच्या स्थायी समितीत या शाळा सुरू राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: ZP continued to remain in English school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.