जि.प. सदस्य करणार उपोषण
By Admin | Updated: April 14, 2017 02:57 IST2017-04-14T02:57:40+5:302017-04-14T02:57:40+5:30
आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातील अनेक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय व दैनावस्था तसेच जिल्ह्यातील

जि.प. सदस्य करणार उपोषण
पालघर : आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातील अनेक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय व दैनावस्था तसेच जिल्ह्यातील इतर विविध प्रश्नाबाबतीत लोकांमधील तीव्र नाराजी लक्षात घेता जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हा प्रशासनास दिला आहे. या मागण्या मान्य होईस्तव हे उपोषण मोखाडा तहसील कार्यालयासमोर सुरु ठेऊ असे पत्रही जिल्हाधिकारी यांना दिले आहे. १९ एप्रिलपासून बसणाऱ्या उपोषणाच्या अनुषंगाने निकम यांनी आश्रमशाळांच्या विविध मागण्याबरोबरीने मोखाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने सुरु असलेल्या कामाबाबत कामे दिलेले ठेकेदार ही कामे करण्यात कसूर करत असून अशा ठेकेदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली लाटल्या जमिनी
या प्रमुख मागण्यांबरोबरीने व्याघ्र प्रकल्पासाठी मोखाडा पळसपाडा येथील अनेक आदिवासींच्या जमिनी शासनाने ताब्यात घेऊन त्यांची फसवणूक केली असून त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात, मोखाडा व परिसरात गरिबांना वीज वापर नसताना सुद्धा महावितरण अवाढव्य बिले आकारते. या परिसरात बीएसएनएलचे नेटवर्क मात्र ते नेहमीच मंद सेवा देत असते अशा वेळेस येथील लोकांची गैरसोय होते. त्याविरोधातही निकम यांनी लढा पुकारला असून या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण करणार आहेत असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.