शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सापांना जीवनदान देणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 00:52 IST

साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात.

- वसंत भोईरवाडा - साप म्हटले की अनेकांना धडकी भरते. अनेकदा त्यांना मारण्यासाठी हात सरसावतात, मात्र लहानपणी सापांना विनाकारण मारताना त्याने पाहिले आणि ठरवले विनाकारण आपल्याला त्रास न देणा-या सापांचे आपण रक्षण करायचे आणि सुरू झाला प्रवास एका सर्प रक्षकाचा !वाडा तालुक्यातील चिखले येथील सागर पाटील या तरूणाने आजपर्यंत शेकडो सापांचे प्राण वाचवले आहेत. सागर याने आजपर्यंत नाग, मण्यार, अजगर, फोडसा, कांबळ्या अशा विषारी सापांना पकडून जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहे. स्वत:चे अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणारे साप भीतीपोटी व अंधश्रध्देपायी माणसाकडून विनाकारण मारले जातात.खरं तर प्रत्येक जीव हा अन्नसाखळीतील व पर्यायाने पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना मारून आपण कळत नकळत पर्यावरण संतुलनावरच घाला घालत आहोत. अलिकडच्या काळात सापांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून वैविध्यतेचे प्रमाणही कमी झाले आहे. निसर्गचक्र सुरळीतपणे चालण्यासाठी साप वाचवणे गरजेचे आहे. यासाठीच मी सापांच्या रक्षण करण्याचे ठरवले आहे असे सागर सांगतो.तालुक्यातील विविध गावांमधून त्याने दोनशेहून अधिक साप पकडले असून ते वाडा वन विभागाच्या मदतीने जंगलात सुरक्षितस्थळी सोडले आहेत. कुणीही सापांना मारू नये, जर आपल्या परिसरात साप आढळून आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सागर पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार