स्टेशन परिसरात तरु णाला लुटले; आठवड्यातील दुसरी घटना
By Admin | Updated: August 21, 2015 02:12 IST2015-08-21T02:12:54+5:302015-08-21T02:12:54+5:30
पश्चिमेकडे स्टेशन परिसरात रामदास जाधव या तरुणाचा दोन अज्ञात व्यक्तींनी आपण नगरसेवक असल्याचे सांगूून गळ्यातील १० ग्रॅमची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी

स्टेशन परिसरात तरु णाला लुटले; आठवड्यातील दुसरी घटना
अंबरनाथ : पश्चिमेकडे स्टेशन परिसरात रामदास जाधव या तरुणाचा दोन अज्ञात व्यक्तींनी आपण नगरसेवक असल्याचे सांगूून गळ्यातील १० ग्रॅमची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी आणि ११ हजारांची रोकड असा ५० हजारांचा ऐवज लुटला, ही घटना बुधवारी घडली.
ठाण्यातील एका खासगी कंपनीत सेल्समनचे काम करणारा रामदास हा दोन मित्रांसह अंबरनाथमध्ये मोबाइल खरेदीसाठी आला होता. मात्र, स्टेशन परिसरात आल्यानंतर त्याला एका अनोळखी व्यक्तीने धक्का देऊन मी इथला नगरसेवक आहे, असे सांगून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी आणि ११ हजार रोख रक्कम काढून साथीदारासह चलाखीने पोबारा केला. विशेष म्हणजे स्टेशन परिसरात हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीत या वेळी पोलीसदेखील होता. गेल्या आठवड्यातही एका व्यापाऱ्याच्या नोकराकडून ६० हजारांची रोकड पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. चोरांना लवकरात लवकर पकडले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, त्यात यश आले नसताना पुन्हा चोरीचा हा दुसरा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बुधवारी उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
(वार्ताहर)