शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पार्किंगच्या वादातून युवकाची केली हत्या; हाऊसिंग सोसायटीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 14:49 IST

तिघांवर हत्येचा गुन्हा वसई पोलिसांत दाखल; संचारबंदी काळातील वसईतील दुसरी हत्या

वसई :मागील रविवारी माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  पं.दीनदयाळ नगरात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना ताजी असताना आता वसई पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अशीच एक घटना शनिवारी घडली आहे. सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात संचारबंदी लागू आहे.  त्यातच प्रशासन वारंवार लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करते आहे. मात्र, वसईत आता पार्किंगच्या किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी वसई पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,वसईत किरकोळ वादातून एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. वसई कोर्ट च्या मागील बाजूस साईसृष्टी सोसायटीच्या परिसरात महेश बडगुजर (वय 40 ) हे आपली कार पार्किंग करत होते. त्यावेळी या कार पार्किंगच्या वादावरून सुभाष राठोड ,अंजना राठोड आणि  हेमंत चव्हाण यांच्यासोबत प्रथम बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

दरम्यान या तिघांनी मिळून महेश बडगुजर यांना अमानुष रित्या लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. परिणामी या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महेश बडगुजर यांना तातडीने पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता पालिकेच्या डॉक्टरांनी या युवकास मृत घोषित केलं. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी सुभाष राठोड, अंजना राठोड आणि  हेमंत चव्हाण या तिघांना तात्काळ अटक केली असल्याचे वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत ला सांगितले.

टॅग्स :Murderखूनcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारPoliceपोलिस