Vasai Crime: वसईतून आत्महत्येचे एक हादवरणारं प्रकरण समोर आलं आले. तरुणाने विषारी वायूचा वापर करुन स्वतःला संपवल्याचा प्रकार पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी मोठी तयारी केली होती. मृत्यूपूर्वी तरुणाने एक चिठ्ठी लिहून दारावर चिकटवली होती. गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या तरुणाने कार्बन मोनोऑक्साइडचा वापर करुन आत्महत्या केल्याचे तपासात समोर आलं आहे. तरुणाच्या या कृतीने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वसईच्या २७ वर्षीय श्रेय अग्रवाल या तरुणाने कार्बन मोनॉक्साईड गॅसचा वापर करून आत्महत्या केली. वसईच्या कमांड भागात स्पॅनिश व्हिलाच्या 'क्लस्टर-9' बंगल्यात श्रेयचा मृतदेह सापडला. श्रेय अग्रवालच्या बहिणीची तक्रार मिळाल्यानंतर नयागाव पोलीस बंगल्यावर पोहोचले असता त्यांना दरवाजावर लावलेली एक चिठ्ठी दिलली. दरवाजावर 'आत कार्बन मोनॉक्साईड आहे, दिवे लावू नका' असा इशारा देणारी नोटीस चिकटवण्यात आली होती. श्रेय अग्रवालने विषारी वायूचे सिलिंडर कोठून आणले, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
बंगळुरूमधील श्रेयच्या बहिणीने मुंबई पोलिसांना ईमेल करून बेपत्ता भावाची माहिती विचारली होती. गेल्या आठवड्यात शनिवारी श्रेयचे कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांना त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन तो वसईमध्ये असल्याचे समजलं. लोकेशनच्या आधारे पोलीस त्याच्या बंगल्याजवळ पोहोचले. बंगल्याच्या दारावर लावलेले पत्र पाहून पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलवून घेतलं.
पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा श्रेय अग्रवाल सापडला, जो मृतावस्थेत होता. त्याने विषारी गॅस सिलिंडरचा श्वास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्या चेहऱ्यावर इनहेलेशन मास्क होता, जो कार्बन मोनोऑक्साइड सिलेंडरला जोडलेला होता. बेडजवळील भिंतीवर त्याने सुसाईड नोटही चिकटवली होती.
काय म्हटलं शेवटच्या चिठ्ठीमध्ये?
"मी माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारण म्हणजे मी दोन मोठ्या आरोग्याच्या समस्यांमधून जात आहे. या आजारांवर कोणताही इलाज नाही. गेल्या दीड वर्षांपासून ही समस्या वाढत आहे. मी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, पण कोणीही मला मदत करू शकले नाही. या समस्यांमुळे माझी नोकरीही धोक्यात आली आहे. माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला गेल्या दीड वर्षात खूप प्रोत्साहन दिले," असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.