वसईत तरुणाचा तरुणीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 05:35 IST2019-09-19T05:35:51+5:302019-09-19T05:35:55+5:30

वालीव विभागातील खैरपाडा येथील कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर एकाने मंगळवारी रागाच्या भरात चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.

The young girl's niece in the room | वसईत तरुणाचा तरुणीवर चाकूहल्ला

वसईत तरुणाचा तरुणीवर चाकूहल्ला

नालासोपारा : वालीव विभागातील खैरपाडा येथील कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर एकाने मंगळवारी रागाच्या भरात चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. नंतर आरोपी तरु णाने स्वत:वर हल्ला करत जखमी करून घेतले. तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. वालीव पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वालीव गावातील खैरपाडा येथील सबुरी चाळीमधील स्वीच बनविण्याच्या कंपनीमध्ये आरती झा (२४) आणि नात्याने बहीण असलेली पुष्पांजली मिश्रा (१८) या दोघी कामाला आहेत. याच कंपनीमध्ये कंत्राटदार म्हणून विनोद यादव आणि विकास यादव हे दोघेही कामाला होते. मंगळवारी दुपारी विनोदला विकासने फोन करून आता मी या जगात राहणार नाही, मला माफ कर, असे बोलून मोबाइल बंद केला. घाबरलेल्या विनोदने आरतीला फोन करून विकासबाबत विचारताच तो दारू प्यायला आहे, त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, असे सांगितले. हे विकासला कळल्यावर रागाच्या भरात त्याने पळत आरतीकडे जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवून मानेवर उजव्या बाजूला चाकूने वार केला व नंतर स्वत:च्या मानेवरही चाकूने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The young girl's niece in the room