शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

यंदा कलमी आंब्याची आवक कमीच, शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 00:07 IST

निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा, त्याच बरोबरच कमी जास्त होत चालेला पाऊस, कमी अधिक थंडी व ढगाळ वातावरण त्याचा परिणाम यंदा पुन्हा आंबा उत्पादनावर झालेला असुन तालुक्यामध्ये अद्याप आंबा बाजारात आला नाही.

- राहुल वाडेकरविक्रमगड - निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा, त्याच बरोबरच कमी जास्त होत चालेला पाऊस, कमी अधिक थंडी व ढगाळ वातावरण त्याचा परिणाम यंदा पुन्हा आंबा उत्पादनावर झालेला असुन तालुक्यामध्ये अद्याप आंबा बाजारात आला नाही. येथील प्रसिध्द असलेला गावठी हापुस व केसर मे महिना सुरु होवूनही हाती आलेला नाही.दरवर्षी हा आंबा बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. मात्र, या आंब्यांचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हा हंगाम लांबत चालला आहे. फळ पिकण्याचा कालवधी लांबल्याने जुन उजाडण्याचे संकेत आहे. त्यामुळे बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. विक्रमगड हा आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून यंदा त्यात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने कमी उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार शेतकऱ्यांनी सांगितले.विक्रमगडमध्ये केसर व हापूस आंब्याचे चांगले उत्पन्न आहे. परंतु पाहिजे तसे उपन्न निघत नसल्याने शेती प्रमाणे सर्वच अलबेल झालेले आहे़ यंदा सुरुवातीपासुनच चांगला मोहर आला होता. परंतु, मध्येच उष्मा व थंडी तसेच ढगाळ वातारणामुळे कलमी बागायती असणाºया आंब्यांचे उत्पन्न घटले आहे. तर गावठी आंब्याचे उत्पादन साध्या वाढले असल्यााचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.साधेरणपणे जानेवारी महिन्यात आंब्यांचा झाडांना मोहर येत असतो परंतु यंदा आंब्याचा मोहर लांबला तसेच, मोहर गळला, फळ धारना झाल्यावर लहान आंबे गळुन पडले असे अनेक नुकसान दायी प्रकार घडले होते.़ त्यामुळे साहजिकच आंबा उत्पादनास जुन उजाडणार आहे. पावसाला सुरुवात झाली म्हणजे आंब्याचे भाव पडलेले असतात, आंबे खराब होवून अखेर फेकुन दयावे लागतात़गावरान हापूस व केसर झाला दुर्मिळआंब्यांच्या उत्पादनासाठी पोषक वातारण मिळत नसल्याने गावरान हापुस व केसर यावर्षीही दुर्मिळ बनला आहे. गेल्या दोन-चार वर्षापासुन जुनी आंब्यांची झाडेही कमी झालेली आहेत़शिल्लक राहीलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाही पुर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही़नविन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही़ याशिवाय गावरान कैºयांचेच लोणचे ग्रामीण भागात आजही प्रथम पसंतीचे मानले जाते़ एकंदरीत त्याचा आस्वाद घेणेही दुर्मिळ झालेले आहे़.आमरसही झाला दुर्मिळढगाळ हवामान, बदलते वातावरण,निसर्गाचा लहरीपणा पोषण वातारणाचे प्रमाण कमी यामुळे आंब्यांच्या उत्पादनात दिवसेदिवस कमालीची घट होत चाललेली आहे़ याचबरोबर ग्रामीण भागातील प्रसिध्द आमरसही दुर्मिळ होत चालेला आहे़ याचबरोबर गेल्या २-३ वर्षापासून आंब्यांचे उत्पादन घट आहे़ व ग्रामीण गावठी केसर हापूस पाहावयास मिळतो की नाही याची शक्यता खूप कमी दिसत आहे़यंदा गावठी कलमी हापूस व केसरचे उत्पादन कमी आहे़ तर याउलट आंबट गावठी छोटे जंगली आंब्यांचे उत्पन्न वाढले आहे़ सुरुवातीला या कलमी झाडांचा मोहर बहरला होता. परंतु मध्यतरीच्या काळात हाच मोहर करपला त्यामुळे कलमी आंब्याचे उत्पादन कमी असल्याने यंदा हापुस व केसरी आवक कमी राहील त्यामुळ हापुस १५० ते २०० रुपये किलो तर केसर १०० ते १५० रुपये भाव राहील़ - बबन दामोदर सांबरे, आंबा उत्पादक ओंदेगाव

टॅग्स :Mangoआंबाpalgharपालघर