डहाणू प्रांत कार्यालयावर कष्टकऱ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: August 31, 2016 02:53 IST2016-08-31T02:53:39+5:302016-08-31T02:53:39+5:30
‘ना लोकसभा ना विधानसभा सबसे उपर ग्रामसभा’, ‘जंगल आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ या घोषणाच्या गजरात संसदेने कँम्पा कायद्यात दुरु स्ती करुन वनहक्क

डहाणू प्रांत कार्यालयावर कष्टकऱ्यांचा मोर्चा
डहाण : ‘ना लोकसभा ना विधानसभा सबसे उपर ग्रामसभा’, ‘जंगल आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ या घोषणाच्या गजरात संसदेने कँम्पा कायद्यात दुरु स्ती करुन वनहक्क कायद्याच्या बरोबरीने कँम्पा कायद्याचे नियमन करावे. वनहक्क कायद्याची योग्य अमलबजावणी करावी. सर्व गहाळ व प्रलंबित दावे मंजूर करावे. या प्रमुख मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेने प्रांत कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन सुर केले आहे.
तत्पूर्वी हा मोर्चा सागरनाका येथून प्रांत कार्यालयावर येतांना वाटेतच असणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयावर वळविण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व कष्टकरी संघटनेच्या शिराज बलसारा, अँड . पिटर प्रभू, अँड ब्रायन लोबो यांनी केले. मोर्चा तर्फे उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांना निवेदन देण्यात आले.
जंगलपट्टी भागातील वेगवेगळ्या गावातून कष्टकरी संघटनेचे हजारो स्त्री पुरुष कार्यकर्ते मोर्चा आणि धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रांत कार्यालया समोर बोर्डी - डहाणू रस्त्यावर धरणे आंदोलन धरल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली होती., सर्व मागण्या मान्य होई पर्यंत धरणे चालू ठेवण्याचा निर्धार मोर्चेकाऱ्यानी केला आहे (वार्ताहर)