शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

कोंढले उपकेंद्राचे काम ६ वर्षे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:41 IST

तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिककरण याचा विचार करून महावितरणने कोंढले येथील ४०० केव्हीए च्या वीज उपकेंद्राला सन २०११ मध्ये मंजुरी देऊन कामाला सुरु वात केली होती.

वाडा : तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिककरण याचा विचार करून महावितरणने कोंढले येथील ४०० केव्हीए च्या वीज उपकेंद्राला सन २०११ मध्ये मंजुरी देऊन कामाला सुरु वात केली होती. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुदत संपून सहा वर्षे झाली तरी काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे नागरिक व उद्योजकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वाडा तालुक्यात डी प्लस झोनमुळे उद्योगधंदे वाढले. गांध्रे (वाडा) येथे असलेल्या वीज वितरण केंद्रावर मोठा भार पडत होता. तसेच वीज जनित्रांमध्ये बिघाड होऊन अनेक गावे अंधारात बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने येथे ४०० केव्हीए उपकेंद्राला मंजुरी दिली. २०११ मध्ये १९.७५ हेक्टर जागेवर २२ महिन्याच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याच्या अटीवर या कामाचा ठेका ज्योती स्ट्रक्चरला दिला. मुदत संपून सहा वर्षे उलटली तरीही हे काम अपूर्णच आहे.या उपकेंद्रातून वीज मिळेल, आपली कंपनी सुरू होईल या आशेवर तीनशेपेक्षा जास्त उद्योजक आजही आहेत. मात्र हे उपकेंद्र रखडल्याने वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कंपन्या बंद आहेत. शिवाय या परिसरातील वीजेच्या लपंडावाने येथील नागरिकही त्रस्त झाले आहेत.या उपकेंद्राचे घोंगडे भिजत राहिल्याने उद्योजकांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. वीज उपकेंद्राचे काम युध्दपातळीवर करून पूर्ण करण्याची मागणी भाजपाच्या कार्यकत्या अंकिता दुबेले यांनी महावितरणकडे केली आहे. यासंदर्भात महावितरणचे अधिकारी चंद्रशेखर कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता वीज उपकेंद्राच्या कामाची मुदत सन २०१८ पर्यंत असून येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली.मात्र ही मुदतवाढ कोणी, कधी, केंव्हा, कशासाठी दिली याचा कोणताही खुलासा त्यांनी अथवा महावितरणने केलेला नाही.