शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

मुरबे बंदर जनसुनावणीत महिलांचा आक्रोश, ग्रामस्थांकडून सातत्याने विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:27 IST

पोलिसांनी काळे शर्ट घातलेल्या तरुणांना प्रवेश नाकारल्याने उपस्थितांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या ही बाब निदर्शनास आणून देत आंदोलनाची भूमिका घेतली.

- हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जेएसडब्ल्यू कंपनीचे नियोजित मुरबे बंदर उभारणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी जनसुनावणी आयोजित केली होती. प्रस्तावित बंदराला परिसरातील ग्रामस्थांकडून सातत्याने विरोध आहे. सोमवारी जनसुनावणीदरम्यानही जनक्षोभ उसळलेला. ‘समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा..’ अशा घोषणा देत महिलांनी आक्रोश केला.

जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली ही जनसुनावणी आयोजित केली. याविरोधात मुरबे, नांदगाव, सातपाटी, आलेवाडी, खारेकुरण, वडराई, माहीम, नवापूर, पाम आदी भागातील सुमारे  दहा हजार  नागरिक उपस्थित होते.   रद्द केलेले बंदर आताही शासनाने कितीही जोर लावला तरी होऊ देणार नाही, असे मुरबेच्या सरपंच मोनालिसा, सातपाटीच्या सरपंच सीमा भोईर-तरे, मनसेचे उपजिल्हाप्रमुख धीरज गावड, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे, संजय कोळी आदींनी सांगितले. तर  १३ वर्षांपूर्वी रद्द केलेला प्रकल्प यशस्वी होऊ देणार नाही, असे शिवसेनेा उपनेते दीपक राऊत यांनी सांगितले. 

स्थानिकांना १०० टक्के रोजगारप्रस्तावित मुरबे बंदर उभारणीनंतर कुठल्याही परिस्थितीत परिसरातील स्थानिकांना रोजगार, आरोग्याच्या सुविधांमध्ये १०० टक्के प्राधान्य देण्यात येणार आह. स्थानिकांवर अन्याय होणार नाही याची हरप्रकारे काळजी घेतली जाईल. बंदरामुळे परिसरातील स्थानिकांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असे जेएसडब्ल्यूच्या वतीने सुहास देशपांडे यांनीस्पष्ट केले.  

काळे शर्ट, स्कार्फना मज्जावस्थानिकांचा विरोध असल्याने अनेकांनी काळे शर्ट, स्कार्फ, ओढण्या घातल्या होत्या. महिलांचे स्कार्फ, मुलींच्या अंगावरच्या काळ्या ओढण्या बाहेर काढायला लावून आत कार्यक्रमस्थळी पाठविल्याने मुलींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी काळे शर्ट घातलेल्या तरुणांना प्रवेश नाकारल्याने उपस्थितांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या ही बाब निदर्शनास आणून देत आंदोलनाची भूमिका घेतली.

‘आरोग्य, रोजगार, सुरक्षिततेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असून, त्याची आम्ही नोंद घेतली आहे. सर्वांचे जनसुनावणीमधील म्हणणे नोंदवून ते केंद्र आणि राज्याच्या समितीकडे पाठविण्यात येणार आहे.डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर

English
हिंदी सारांश
Web Title : Murbe Port Hearing: Women Protest, Villagers Steadfastly Oppose Project

Web Summary : Villagers strongly protested JSW's proposed Murbe port at a public hearing. Residents fear environmental damage and demand guaranteed local jobs. Authorities noted concerns regarding health, employment, and safety, promising review by state and central committees.
टॅग्स :palgharपालघर