सावित्रीबाई जयंतीनिमित्ताने महिला मेळावा

By Admin | Updated: January 11, 2016 01:44 IST2016-01-11T01:44:34+5:302016-01-11T01:44:34+5:30

विधायक संसद व श्रमजीवी महिला ठिणगीच्या संयुक्त संयोजनातून विक्रमगड तालुक्यातील विठ्ठल मंदिर ज्ञानेश्वर माउली सभागृहामध्ये महिला मेळावा संपन्न झाला़

Women's Meet organized by Savitribai Jayanti | सावित्रीबाई जयंतीनिमित्ताने महिला मेळावा

सावित्रीबाई जयंतीनिमित्ताने महिला मेळावा

तलवाडा: विधायक संसद व श्रमजीवी महिला ठिणगीच्या संयुक्त संयोजनातून विक्रमगड तालुक्यातील विठ्ठल मंदिर ज्ञानेश्वर माउली सभागृहामध्ये महिला मेळावा संपन्न झाला़ या मेळाव्यात सावीत्रीबाईचे जीवनकार्य, महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या अंधश्रध्दा व गैर प्रथा, कुपोषण निर्मूलन अभियानांर्तगत कुपोषणाची कारणे, उपाययोजना व कुपोषण निर्मूलन अभियानातील संघटनेचा विचार इ. विषयांबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यांत आले़
महिला मेळाव्यांच्या ठिकाणी विधायक संसद व वाचा संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार झालेल्या महिला ठिणगीच्या लर्निंग कम्युनिटी या युवती गटाकडून महिला मेळाव्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेविषयी जन जागृती करणारे अब नही तो कब ? हे पथनाटय सादर करण्यांत येते़ विधायक संसद संचालित एकलव्य परिवर्तन विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इ़ ८ वीतील विद्यार्थीनी संचिता वरठा, वृषाली रेंजड, मनीषा जनाठे, योगीता खरपडे, या व बालसंघटनेच्या कार्यकर्त्या असलेल्या सोनाली लोखंडे, गीता खिराडे, नीलम बीज, दिपाली भोईर या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवती या पथनाट्यात भूमिका साकार करीत आहेत.
एकलव्य परिवर्तन विद्यालयात शिक्षण घेतलेली व सध्या कायद्याचा अभ्यास करीत असलेली पूजा सुरुम ही त्याचे संयोजन करीत आहे़ कुपोषण निर्मूलन अभियाना अंतर्गत जनजागृतीपर असलेले पथनाटय एकलव्य परिवर्तन षाळेच्या पूजा वांगड, निशा गोवारी, जुई गावित, प्राजक्ता नानकर, ज्योती वड, हर्षला थोरात,बेबी चौधरी, मनिषा वाघ, प्रियंका नानकर, सपना जाधव या मुली मेळाव्यांतून सादर करतात़ श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लताताई पंडित यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनातून तयार झालेल्या महिला ठिणगी कार्यकर्त्या पालघरच्या महिला ठिणगी प्रमुख अनिता धांगडा, सचिव सरिता जाधव, संघटक दामिनी भोईर, रेखा धांगडे, नंदा विघ्ने, प्रमिला महाले यांच्या संयोजनातून पालघर जिल्हयांतील वसई, वाडा,व पालघर तालुक्यांत मेळावे सपंन्न झाले़ तर ठाणे जिल्हयांत जिल्हा महिला ठिणगी प्रमुख जया पारधी, उपप्रमुख नंदा वाघे, सचिव संगीता भोमटे, संघटक आशा भोईर, यांच्या टिमने भिवंडी व ठाणे तालुक्यांतील मेळाव्यांचे संयोजन केले़ विधायक संसदेच्या सचिव स्रेहा दुबे यांचे मार्गदर्शन व नियोजनातून या मेळाव्यांची आखणी झाली़ कुपोषण निर्मुलन विषयक जनजागृती, महिलांविषयक, कायदे, अंधश्रध्दा व स्त्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या गैर सामाजिक प्रथा-परंपरा महिलांच्या ग्रामसभा, पेसा कायद्यातील तरतुदी इ़ विषयांवर ठिणगीच्या कार्यकर्त्यां महिला मेळाव्यांमधून मांडणी करीत आहेत़
विक्रमगडच्या महिला मेळाव्याप्रसंगी संघटनेचे सहसरचिटणीस विजय जाधव, युवा बालसंघटक प्रमुख अनिल जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, जिल्हा उपध्यक्ष लक्ष्मण फडवले, जिल्हा ठिकणी प्रमुख अनिता धांगडा, उपप्रमुख सविता कासट, सचिव सरिता जाधव, प्रभारी ता़ अध्यक्ष तथा उपाध्यक्ष गंगाराम वरठा, तालुका सचिव कैलास तुंबडा, महिला ठिणगी संघटक दामिनी भोईर, रेखा धांगडे, राज्य व्यवस्थापन समिती सदस्य कमलावती जाधव, झोनप्रमुख हिराबाई जाधव उपस्थित होते़
(वार्ताहर)

Web Title: Women's Meet organized by Savitribai Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.