नियम मोडण्यात महिला आघाडीवर
By Admin | Updated: February 10, 2017 03:55 IST2017-02-10T03:55:54+5:302017-02-10T03:55:54+5:30
लायसन्स,परमिटसह अन्य कागदपत्रे जवळ नसणे, अवैध वाहतूक करणे बेकायदेशीररित्या गाड्या चालविणे आदी गुन्हे करणाऱ्या सुमारे १ हजार

नियम मोडण्यात महिला आघाडीवर
पालघर : लायसन्स,परमिटसह अन्य कागदपत्रे जवळ नसणे, अवैध वाहतूक करणे बेकायदेशीररित्या गाड्या चालविणे आदी गुन्हे करणाऱ्या सुमारे १ हजार चालकांकडून पालघर पोलिसांनी लाखो रु पयांचा दंड वसूल केला असून विशेष म्हणजे हे गुन्हे करणाऱ्यात ७० टक्के महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हाती आली.
पालघर शहरात पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी चार रस्ता, जगदंबा हॉटेल, माहीम वळण रस्ता, टेम्भोडे पेट्रोल पंप, हुतात्मा स्तंभ इ. ठिकाणी मोटारसायकल स्वार, रिक्षा चालक, सहाआसनी रिक्षा चालक, जडवाहतूक करणारे ट्रक इत्यादींची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यावेळी वाहनचालकांकडे लायसन्स-गाडीची कागदपत्रे नसणे, ट्रिपल सीट, बॅज नसणे, परिमट नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालका विरोधात मोठी कारवाई केली. मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर अनेकांनी आपले मित्र, नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे पूर्व सूचना दिल्याने अनेकांना आपल्यावरील कारवाई टाळता आली. मात्र आपल्या स्कुटी वरून शहरात फिरणाऱ्या अनेक मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला यांच्याकडे लायसन नसल्याचे पोलिसांना आढळून आले. दंड करण्यात आलेल्या मध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचे आढळून आले अनेक राजकीय, प्रतिष्ठित व्यक्ती या कारवाई पासून आपल्या नातेवाईकांची सुटका व्हावी यासाठी पोलिसां कडे आपले वजन खर्ची घालण्याचा प्रयत्न करीत होते. आता लवकरच हेल्मेट सक्तीची मोहीमही उघडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)