महिलेचा होरपळून मृत्यू; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:22 IST2018-03-03T05:22:58+5:302018-03-03T05:22:58+5:30
शहरातील खैरपाडा परिसरात दुकानाला लागलेल्या आगीत मंजूदेवी हिरालाल निर्मळ (४५) या महिलेचा होरपळून मृत्यू झाला, तर ब्रिजेश लखीचंद गोसाई हे जखमी झाले आहेत.

महिलेचा होरपळून मृत्यू; एक जखमी
वसई : शहरातील खैरपाडा परिसरात दुकानाला लागलेल्या आगीत मंजूदेवी हिरालाल निर्मळ (४५) या महिलेचा होरपळून मृत्यू झाला, तर ब्रिजेश लखीचंद गोसाई हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. गुरुवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.