पुणे संघ विजेता

By Admin | Updated: April 25, 2017 01:13 IST2017-04-25T01:13:28+5:302017-04-25T01:13:28+5:30

तालुक्यातील बहिरीदेव स्पोर्ट्स क्लब बहिरीचा पाडा यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत सिलेक्टेड पुणे संघ विजेता

Winner of the Pune team | पुणे संघ विजेता

पुणे संघ विजेता

अलिबाग : तालुक्यातील बहिरीदेव स्पोर्ट्स क्लब बहिरीचा पाडा यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत सिलेक्टेड पुणे संघ विजेता ठरला, तर उपविजेतेपद आरमार विक्रांत मुंबई संघाने पटकावले. तृतीय क्रमांक मॉडर्न स्टार रांजणखार संघ आणि चतुर्थ क्रमांक बहिरीदेव स्पोर्ट्स क्लब बहिरीचा पाडा संघाने पटकाविला.
स्पर्धेत अंतिम सामना पुणे विरु ध्द मुंबई संघात झाला. त्यात २१-१५ असा विजय संपादन केला. स्पर्धेत राज्यातील १६ नामवंत संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन मानकुळे ग्रामपंचायत सरपंच लतिक पाटील यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ पाटील, सुदाम पाटील, मारुती पाटील,भरत पाटील, सुनील म्हात्रे व संघातील सदस्य आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी सरपंच डॉ. मनोज पाटील, सुनील म्हात्रे, दि.म. पाटील, भरत पाटील, कमलाकर पाटील आदींनी खेळाडूंचा सत्कार केला. पंचाची कामगिरी सुनील म्हात्रे ,रेवन पाटील, सुधाकर पाटील यांनी पार पाडली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Winner of the Pune team