मनोरला ठाकूर दत्तक घेणार?
By Admin | Updated: November 10, 2016 02:51 IST2016-11-10T02:51:32+5:302016-11-10T02:51:32+5:30
नांदगाव तर्फे मनोर गाव दत्तक घेण्यासाठी महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी संबंधित अधिकारी व ग्रामस्थांबरोबर नांदगाव येथे सभा घेऊन चर्चा केली

मनोरला ठाकूर दत्तक घेणार?
मनोर : नांदगाव तर्फे मनोर गाव दत्तक घेण्यासाठी महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी संबंधित अधिकारी व ग्रामस्थांबरोबर नांदगाव येथे सभा घेऊन चर्चा केली त्यासाठी पालघर जिल्हा भाजप अध्यक्ष व आमदार पास्कल धनारे, जि. प. अध्यक्ष सुरेखा थेतले, विनिता कोरे सभापती, सतीश देशमुख अप्पर जिल्हाधिकारी, महेंद्र सागर तहसिलदार, सुजित पाटील, उपाध्यक्ष भाजप, वसंत चव्हाण उपाध्यक्ष नारायण सवरा, उप सरपंच, सरपंच इंद्रा गणपत तांबडी, विनोद पोद्दार, गटविकास अधिकारी जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी त्या म्हणाल्या की मी गावाच्या विकासासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावले आहे. तुम्हाला काय हवे आहे असे ते सांगा. मी ते तत्परतेने साकारेन. यावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी आरोग्य, महसूल, बालकल्याण, वनविभाग, कृषी विभागा चे अधिकारी उपस्थित होते त्यांचा बरोबर चर्चा करण्यात आली आज आदर्श आमदार गाव दत्तक विषय आढावा मीटिंग आयोजित केली होती. (वार्ताहर)