स्कायवॉक मनपाकडे हस्तांतरित होणार ?

By Admin | Updated: September 7, 2015 22:43 IST2015-09-07T22:43:22+5:302015-09-07T22:43:22+5:30

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या १४ सप्टेंबरला होणाऱ्या महासभेमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेले स्कायवॉक हस्तांतरित करणे, भारतीय सैन्यातील माजी

Will Skywalk be transferred to the Municipal Corporation? | स्कायवॉक मनपाकडे हस्तांतरित होणार ?

स्कायवॉक मनपाकडे हस्तांतरित होणार ?

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या १४ सप्टेंबरला होणाऱ्या महासभेमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेले स्कायवॉक हस्तांतरित करणे, भारतीय सैन्यातील माजी सैनिकांसाठी इमारतीमध्ये जागा देणे व महानगरपालिका क्षेत्रातील वनहक्क दाव्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय समितीवर प्रभागनिहाय ३ सदस्यांची नेमणूक करणे, अशा तीन महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात येणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ६ वर्षांपूर्वी वसई पूर्व-पश्चिम तसेच नवघर येथे ३ स्कायवॉक बांधले. हे स्कायवॉक अद्याप महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात न आल्यामुळे या स्कायवॉकसंदर्भातील विकासकामे करणे महानगरपालिकेला शक्य होत नाही. तसेच या स्कायवॉकवर स्वच्छताही नसल्याने नागरिकांना या स्कायवॉकचा वापर करणे शक्य होत नाही. भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य व अन्य बाबी लक्षात घेता प्राधिकरणाने हे स्कायवॉक त्वरित महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी केली आहे. यावर, महासभेत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

नागरिकांना त्रास
स्कायवॉकचे हस्तांतरण न झाल्याने यावर रात्रीच्यावेळा गर्दुल्ले व मवाल्यांचा वावर असतो.
दिवसा सुद्धा या ठिकाणी काही विक्रत्यांनी आपले ठाण मांडलेले असल्याने त्रास होत आहे.

Web Title: Will Skywalk be transferred to the Municipal Corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.