शेतकऱ्यांना वाºयावर सोडणार नाही - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 11:38 PM2019-11-07T23:38:31+5:302019-11-07T23:38:41+5:30

एकनाथ शिंदे : नुकसानीची केली पाहणी

Will not leave the farmers on or off | शेतकऱ्यांना वाºयावर सोडणार नाही - एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाºयावर सोडणार नाही - एकनाथ शिंदे

Next

शहापूर : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी शेतकºयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करण्याची भूमिका आमची आहे. परतीच्या पावसाने भातशेतीचे झालेले नुकसान जाणून घेण्यासाठी बुधवारी चेरपोली येथील शेतकºयांच्या शेतात जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यावेळी बोलताना त्यांनी शहापूर तालुक्यातील शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली.

नुकसानीचे पंचनामे करत असलेल्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे व नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. या वेळी त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ,उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, माजी आमदार पांडुरंग बरोरा,आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. शेतकºयांची अडचण होऊ नये, त्यांना गावपातळीवर अर्ज जमा करता यावेत यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गावागावात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन दिलासा देण्याचे काम करायचे आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Will not leave the farmers on or off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.