शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

आमदार मेहतांना मोक्का लागणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:08 AM

कोकण आयुक्तांचे कारवाईचे आदेश : पर्यावरण ºहासाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

मीरा रोड : पर्यावरणाचा ºहास केल्याप्रकरणी भाजपा आमदार नरेंद्र मेहता व संबंधितांवर मोेक्कासह पर्यावरण संरक्षण कायद्याखाली फौजदारी कारवाई करण्याच्या तक्र ारीवर आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशाने कोकण विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना कार्यवाही करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी कांदळवनाचा ºहास करणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जात असल्याने अहवाल दिला, तरी कारवाई होणार का, हा प्रश्नच आहे.मीरा रोडच्या कनकिया भागात सेव्हन इलेव्हन हॉटेलच्या क्लबचे बांधकाम सुरू आहे. या क्लबच्या सदस्य नोंदणीसाठी भव्य कार्यक्र म झाला. मेहता यांच्या पत्नी सुमन, महापौर डिम्पल मेहता व त्यांचे पती विनोद, जॉनी लिव्हर , मोनिका बेदी आदी कलाकार उपस्थित होते.वास्तविक कांदळवन, पाणथळ, ना विकास क्षेत्र व सीआरझेड बाधित या परिसरात कांदळवनाची तोड करून भराव टाकून भूखंड तयार केले गेले. पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद करून पाणथळ सुकवले, तर कांदळवन तोडले. क्लबच्या इमारतीसह कुंपणभिंत, फ्लोअरिंग, रखवालदाराच्या चौक्या आदी बांधकामे येथे नव्याने केली आहेत.याच भागात २०१० पासून १५ मे २०१८ पर्यंत पर्यावरणाचा ºहास केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल असून यात मेहता यांचा भाऊ विनोद चारही गुन्ह्यात; तर दोन गुन्ह्यात मेहतांच्या पत्नी सुमन यांचा भाऊ रजनीकांत सिंह आरोपी आहे. शिवाय मेहतांचा सहकारी व माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर यांचेही नाव गुन्ह्यात आहे.उच्च न्यायालयाचे आदेश, दाखल गुन्हे, मुख्य वनसंरक्षक यांचा पाहणी अहवाल आदी सर्व काही धाब्यावर बसवून महापालिकेने क्लबसाठी तळघर, तळ व पहिला मजला अशी बांधकाम परवानगी दिली. क्लब व काही बिल्डरांच्या सोयीसाठी कांदळवन, पाणथळ जागेत बेकायदा पक्के गटार व रस्ता पालिकेने बांधला आहे.जेसलपार्क-घोडबंदर रस्ताही मंजुरी नसताना पालिकेने याच मंडळींच्या सोयीसाठी बांधला. महासभेतही कांदळवन, पाणथळ, सीआरझेडमध्ये रस्ता, नाला व जेट्टीचे प्रस्ताव खास क्लबसाठी मंजूर केले आहेत.नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आमदार मेहता, महापौरांनी मीरा रोड पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता आणि गुन्हा दाखल करणारे तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्यावरच गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत ते सुमारे सहा तास तेथे बसून होते. प्रांत अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार अधिक पाटील यांनी तेथे येऊन त्यांची समजूत काढली. तेथे गर्दी जमू लागल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मोठा पोलीस फाटा तैनात करावा लागला.जिल्हाधिकारी, आयुक्तांना पाठवली पत्रेमेहता यांच्यावर मोक्काच्या कारवाईसाठी आलेला तक्र ार अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाने कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाने आता या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि मीरा भार्इंदर महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांना पत्र पाठवून कांदळवन, सीआरझेड तसेच न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन केले असल्यास संबंधित व्यक्ती, संस्था यांच्याविरोधात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेआहेत.‘परवानगी जिल्हाधिकाºयांनीच दिली’मी २०१२ सालीच क्लबच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. विनोद मेहता यांनी २०११ साली राजीनामा दिला आहे. पण सात बारावरील नोंदीत संचालक म्हणून नाव आहे, म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर यांनी दिली. संचालक हे मालक नसतात. मोक्का लावायचा किंवा गुन्हा दाखल करायचा असेल, तर जरूर करा; पण ज्याने पर्यावरणाचा खरोखर ºहास केला त्यांच्यावर करा. क्लबच्या बेसमेंटसाठी जिल्हाधिकाºयांनीच उत्तखननाची परवानगी दिली आहे, त्याचे काय? असा सवालही त्यांनी केला. या संदर्भात आमदार नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाइल बंद होता.

टॅग्स :environmentवातावरण