संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

By Admin | Updated: September 12, 2016 03:02 IST2016-09-12T03:02:12+5:302016-09-12T03:02:12+5:30

विक्रमगड तालुक्यातील धामणी या गावातील भिमी बरफा हिची तिचा पती चिंतामणी याने कुऱ्हाडीने हत्या केली.

Wife murdered in suspicious circumstances | संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

संशयातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

विरार :विक्रमगड तालुक्यातील धामणी या गावातील भिमी बरफा हिची तिचा पती चिंतामणी याने कुऱ्हाडीने हत्या केली. तसेच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलींवर बलात्कार आणि सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
चिंंतामण हा चारित्र्याच्या संशयावरून व पैशासाठी भिमीसोबत नेहमी वाद घालीत होता. ६ सप्टेंबरला रागाच्या भरात तिच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याने तिची हत्या केली.
वसई येथे राहणाऱ्या पंकज पांडे या तरुणाने नायगाव मधील एका सतरा वर्षीय मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर बळजबरीने १२ एप्रिल २०१६ पासून श्रीनिवास लॉज मध्ये नेऊन बलात्कार केला होता. पंकज पांडे आणि पीडित मुलगी उत्तर प्रदेश मधील एकाच गावात राहणारे आहेत. आपल्या मुलीची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याची तिच्या आईने तक्रार दिली. मुलगी अज्ञान असल्याने लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे विरार मधील मनवेलपाडा येथे राहणाऱ्या विरेंद्र मिश्रा या सासऱ्यानेच आपण झोपलो असता आपला विनयभंग केल्याची तक्रार सुनेने विरार पोलीस ठाण्यात केली असून मिश्राला अटक करण्यात आली आहे.
तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्व येथून एक १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Wife murdered in suspicious circumstances