शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कुठे खरेदीचा जोर तर कुठे बाप्पांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 04:12 IST

संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गुरुवारचा दिवस खरेदीचा आणि बाप्पांच्या आगमनाचा ठरला. शुक्रवारी रस्त्यावर वाढणारी गर्दी तसेच स्थापनेसाठी होणारी धावपळ पाहता अनेक गणेश भक्तांनी श्रींच्या मुर्ती आदल्या दिवशींच घरी आणणे पसंत केले.

पालघर : संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गुरुवारचा दिवस खरेदीचा आणि बाप्पांच्या आगमनाचा ठरला. शुक्रवारी रस्त्यावर वाढणारी गर्दी तसेच स्थापनेसाठी होणारी धावपळ पाहता अनेक गणेश भक्तांनी श्रींच्या मुर्ती आदल्या दिवशींच घरी आणणे पसंत केले. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन पोलिसांनी संचलन केले.गणपती सणानिमित्त वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर या शहरीभागांमध्ये तुडूंब गर्दी पहायला मिळाली. अनेक ठिकाणी नारळ, फुले व फळांचे बाजार वधारलेले दिसले.जव्हारमध्ये खरेदीसाठी झुंबडयेथे खेडोपाड्यातुन हजारो गणेश भक्त श्रींच्या मुर्ती घेऊन गावाकडे घेऊन जात असल्याचे गुरुवारी पहावयास मिळाले. सजावटी करीता लागणारे साहित्य खरेदीकरीता बाजारात मोठी झुंबड उसलळी होती.किराणा साहित्य, फळ, गुलाल, सजावटीचे साहित्य, रेडीमेड मखर, फुल, हार, अगरबत्ती आदि वस्तू खरेदीकरीता शहरातील व खेडोपाड्यातील भक्तांनी गर्दी केलेली होती. जव्हार तालुक्यात बहुतेक खेडोपाड्यात एक गाव एक गणपती बसविण्याची प्रथ आजही कायम असून गावातील सार्वजनिक मंडळातर्फे एक दिवस आगोदरच तयारी करून वाजत गाजत बाप्पाच्या मुर्ती नेल्या जात होता. सुबक व आकर्षक मुर्ती खरेदी करीता शहरात ठिकठिकाणी भक्तांची गर्दी दिसत होती.जव्हार शहरातून आजु बाजुच्या खेडोपाड्यातील आदिवासी बांधवाकडून दरवर्षी हजारो गणेशाच्या मुर्तीचीं विक्र ी होते. तसेच इतर तालुक्यातील व्यापारीसुद्धा येथून मोठ्याप्रमाणात मुर्तीं घेऊन ठिक ठिकाणी तिची विक्री करतात. आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात एक दिवस आगोदरच ढोल ताशांच्या गजरात मुर्ती घेऊन आपल्या गावी जात होते. शहरात जवळ जवळ ५५० मंडळ व घरगुती गणपतींची स्थापना होते. यात ५ दिवसांचे गणपती बसविण्याची संख्या जास्त आहे.गणपती डकोरेशनला सुध्दा चांगलीच गर्दी दिसत होती. तयार मखर, देव्हारे, तसेच इकोफ्रेंडली मखरांना मागणी पहायला मिळत होती. पुर्वी हेच मखर अथवा डेकोरेशन नागरीक स्वत: आपल्या हाताने करत होते. त्यासाठी १५ दिवस आगोदरच तयारी होत होती. त्यावेळी लोक हौशीने रात्री जागरण करून नव नविन शक्कल लडवून निरिनराळे डेकोरेशन करीत होते, परंतू सध्या चाईना मेड डेकोरेशन मुळे अनेकांनी त्यांनाच पसंती दिल्याचे दिसले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे रेट यंदा वाढलेले दिसले तरी खरेदीमध्ये कुठे ही त्याचा परिणाम दिसला नाही.गणरायाच्या स्वागतासाठी तलासरी सज्ज : शुक्र वार पासून गणेशोत्सव सुरू होत असून गणरायाच्या स्वागता तलासरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सव मंडळे मंडप व सजवटीवर अखेरचा हात फिरवत आहेत तर बाजारात सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकाची झुंबड उडाली आह. या गणेश उत्सवा करीता तलासरी पोलिसही सज्ज असून गुरु वारी तलासरी पोलीसांनी गावातून संचालन केले. तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २५३ गणरायाची स्थापना होणार आहे. आदिवासी भागातील तरु ण पोटापाण्यासाठी कारखान्यात जात असल्याने दहा दिवसांच्या उत्सवा करिता त्याला वेळ मिळत नसल्याने परिसरात तीन दिवसांच्या गणरायाची संख्या जास्त आहे. पण हे तीन दिवसही तो मोठ्या उत्साहाने गणरायाची सेवा करतो. डीजेवर बंदी असल्याने उत्सवाच्या ठिकाणी आपल्या पारंपरिक तारफा नृत्य सादर करतात. यात आदिवासी तरु ण-तरु णी आनंदाने भाग घेऊन गणरायाचे मनोरंजन करतात. या वेळी गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी मंडळाच्या कार्यकर्त्यां बरोबर तलासरी पोलिसही विशेष दक्ष आहेत.