शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

सुसज्ज ग्रामीण रुग्णालय कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:24 IST

जमीन प्रकरणी ३ आॅगस्टला निर्णय : सोळा वर्षांपासून बोईसरमधील रेंगाळलेला प्रश्न

पंकज राऊतबोईसर : तब्बल सोळा वर्षांपासून विविध कारणांनी रेंगाळलेला बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आला असून ३ आॅगस्टला पालघर न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक अडचणींमुळे ग्रामीण रुग्णालयाला दीड दशक विलंब झाल्याने लाखो आदिवासींबरोबरच गोरगरीब तसेच कामगार वर्ग सुसज्ज सेवेपासून वंचित राहिला आहे.

उडलँड प्रोजेक्ट फॉरेस्टमधील ०.९९/०.९९ हेक्टर जागा डहाणू विभागाच्या उपवनसंरक्षकांनी ९ नोव्हेंबर २०१७ ते २७ मार्च २०१८ दरम्यान ग्रामीण रुग्णालयासाठी दिली. या अडीच एकर जागेचा सात बारा पालघर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नावे करण्यात आला. शासनाने वनविभागातर्फे ग्रामीण रुग्णालयासाठी जागा दिली. परंतु सदर जागेवर तारापूर अणुऊर्जा केंद्र (टॅप्स) आणि बीएआरसी (एनपीसीआयएल) यांच्या विभागाने आपला हक्क मागत थेट न्यायालयात दाद मागितली. दरम्यानच्या काळात ७ ते ८ वेळा सुनावणी झाली, २ ते ३ वेळा टॅप्सचे अधिकारी सुनावणीला आले नाहीत. मात्र १६ जुलैच्या सुनावणीला ते उपस्थित होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकून घेतली असून ३ आॅगस्टला होणाºया सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्याची जागा अत्यंत गैरसोयीची३० खाटांचे बोईसर ग्रामीण रु ग्णालय मंजूर होऊन दीड दशक झाले. परंतु जमिनीचा प्रश्न न सुटल्याने सुसज्ज रु ग्णालय उभारण्यासाठी विलंब होत आहे. आज ज्या छोट्याशा इमारतीत रुग्णालय सुरू आहे ती जागा अत्यंत गैरसोयीची असून तेथे ओपीडी व प्रसूती व्यतिरिक्त काहीही विभाग सुरू नाहीत. आजघडीला तेथे ओपीडीचे सुमारे ३०० रुग्ण येत आहेत. परंतु सुसज्ज ग्रामीण रु ग्णालयाअभावी गोर गरिबांना महागड्या व खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात.२००३ ला मिळाली होती मान्यताच्ठाणे जिल्ह्यामध्ये १६ आॅक्टोबर २००३ रोजी तत्कालीन पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत बोईसर ग्रामीण रुग्णालयाला मान्यता देण्यात आल्यानंतर ७ फेब्रुवारी, २००४ ला ठाणे जिल्हा शल्य चिकित्सकांनी बोईसर ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पत्राद्वारे ग्रामीण रु ग्णालय उभारणीस मान्यता मिळाली असून रुग्णालयाची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानी बांधणेसाठी गावाच्या मध्यभागी ५ ते ७ एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती पत्र पाठविले होते.च्दुर्दैवाचा भाग असा की २००३ पासून २०१० पर्यंत बोईसर ग्रामीण रुग्णालयाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत कुणीही गांभीर्याने न घेतल्याने मंजूर झालेले रुग्णालय कागदावरच राहिले. याचे कुणालाही सोयर सुतक नव्हते. २०११ साली रु ग्णालयाच्या जमिनीसाठी पत्रव्यवहार सुरू झाल्यानंतर फक्त आणि फक्त बैठका झाल्या.३ आॅगस्टला होणाºया पालघर न्यायालयात सुनावणी होणार असून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे- राजेंद्र केळकर, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक, पालघर

टॅग्स :hospitalहॉस्पिटलVasai Virarवसई विरार