शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांवर झाली, आता अधिका-यांवर कारवाई कधी?, महापालिकेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 23:52 IST

खटले लढण्यास अपयशी ठरलेल्या वकिलांचे पॅनल बदलण्याचे काम महापालिकेने केले असले तरी अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई कधी करणार असा सवाल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.

वसई : खटले लढण्यास अपयशी ठरलेल्या वकिलांचे पॅनल बदलण्याचे काम महापालिकेने केले असले तरी अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष पाठबळ देणा-या अधिका-यांवर कारवाई कधी करणार असा सवाल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.वसई विरार महापालिकेने दावे लढण्यासाठी गठीत गेलेल्या वकिलांना चार कोटींहून अधिक रुपये फी पोटी देऊनही त्यांच्याकडून समाधानकारक काम केले गेले नसल्याची बाब पाटील यांनी चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर महापालिकेने महासभेत ठराव पारीत करून जुने वकिल बदलण्याचे निर्णय घेतला आहे.मात्र, वकिलांपेक्षा अ़नधिकृत बांधकामांसाठी संबंधित अधिकारी अधिक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी महापालिका आयु्क्तांकडे केली आहे.जुलै २००९ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीतील एकूण ८६७ दाव्यांपैकी ७४७ दावे हे केवळ अनधिकृत बांधकामांशी संबंधित आहेत. यातील अवघ्या ८२ प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगित उठवण्यात वकिलांना यश मिळालेले आहे.उर्वरित ६६५ प्रकरणांमध्ये न्यायालयाचे स्थगिती आदेश कायम आहेत. हे दावे चालवण्यासाठी महापालिकेने या कालावधीत ३ कोटी ९४ लाख ४ हजार ८७० रुपये खर्च केले आहेत, असल्याची माहिती खुद्द महापालिकेने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत नमूद केली आहे.जनतेच्या कररुपी पैशातील कोट्यवधी रुपये फी पोटी खर्च करून केवळ १० टक्के प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगिती आदेश उठवण्यात यश आले आहे. ही बांधकामे ही पूर्णपणे अनधिकृत असतानाही त्यांच्यावरील कारवाईला न्यायालयीन स्थगिती मिळते आणि ती स्थगिती जवळपास ६ ते ७ वर्षे उठवण्यास महापालिकेच्या विधी विभागाला अपयश आल्याची धक्कादायक बाबही उजेडात आली आहे.अनधिकृत बांधकामांमुळे शहरातील शेकडो सर्वसामान्य लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे.यात एकट्या वकिलांवर कारवाई करून महापालिका प्रशासनाने अधिकाºयांना पाठिशी घालण्याचे काम केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.ं

टॅग्स :Vasai Virarवसई विरार