शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! मूलभूत सुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:36 IST

Palghar: आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो, मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही रस्त्याअभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या सुविधांची प्रतीक्षा आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा - विकासाच्या नावावर दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत असून, विविध महामार्ग प्रगतिपथावर नेण्याचे दावे केले जात आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो, मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्रात आजही रस्त्याअभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या सुविधांची प्रतीक्षा आहे. यामुळे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही मूलभूत गरज पूर्ण होण्यासाठी झटावे लागत असेल तर, ‘स्वातंत्र्याने दिले काय…अहो, आदिवासींपर्यंत पोहोचलंच नाय! असे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकटपावसाळ्यात तर चार महिने पूर्णत: संपर्क तुटतो. अक्षरश: बेटावरचे जीवन काढावे लागते. मागील पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या नदीतून पलीकडे जाताना एक शाळकरी मुलगा नदीच्या प्रवाहातून वाहून  जाताना गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले अशा घटना येथे  वारंवार घडतात. 

येथे पुलाची सोय व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु या पाड्याची लोकसंख्या कमी असल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. - बाळू घाटाळ, सरपंच, आडोशी शिरसगाव 

  पालघर जिल्ह्यातील अनेक गावात असे चित्र आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुंबईपासून १०० किमी अंतरावर, तर मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून १५ ते  २० किमी अंतरावर दरी डोंगरात आडोशी शिरसगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत अगदी मोखाडा खोडाळा रस्त्यावर देवबांधपासून काही मैलाच्या अंतरावर, थाळेकरवाडी १६ घरे व ७० लोकसंख्या असलेल्या या पाड्यावरील आदिवासी बांधव नदीच्या पलीकडे वास्तव्य असल्याने रस्ता व पुलाअभावी  गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पुलाअभावी होतेय गैरसोयविकासाच्या  नावाखाली  मोखाड्यात नको त्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधून करोडो रुपये खर्च  केले  जातात; परंतु ज्या  ठिकाणी खऱ्या अर्थाने पुलाची  गरज  आहे तिथे दुर्लक्ष न करता शासनाने लक्ष देऊन थाळेकरवाडी येथे रस्ता व पूल उभारणीची गरज आहे याबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती यांनी बोलताना सांगितले.

आमची कुटुंबं गेल्या १०० वर्षांपासून इथे वास्तव्य करत आहेत. चारही बाजूने नदी  असल्याने पावसाळ्यात आमच्या  पाड्याचा संपूर्ण संपर्क तुटतो. शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती कामानिमित्त ये-जा  करणाऱ्या लोकांना अडचणीचा  सामना करावा लागतो. आजारी पेशंटला डोली करून नदी पार करावी लागते. - संदीप थाळेकर, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :palgharपालघर