खैराने भरलेला टेम्पो जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 23:15 IST2015-07-09T23:15:37+5:302015-07-09T23:15:37+5:30
अंबाडी मार्गावर मांडवी वनक्षेत्रातील कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गणेशपुरी डोंगरीशाळेजवळ बिघाड झालेल्या पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो आढळला

खैराने भरलेला टेम्पो जप्त
पारोळ : अंबाडी मार्गावर मांडवी वनक्षेत्रातील कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गणेशपुरी डोंगरीशाळेजवळ बिघाड झालेल्या पांढऱ्या रंगाचा पिकअप टेम्पो आढळला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बघताच या गाडीचाचालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. त्यावेळी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये बिना परवाना वाहतूक केले जात असलेले खैराचे ४२ नग आढळले. ते मांडवी वनक्षेत्रात आणून त्याचे मूल्यमापन केले असता १६ हजार रुपये घनमीटर प्रमाणे ६ लाख ७२ हजार रुपये असल्याचे मांडवी वनक्षेत्राचे अधिकारी सी.एल. गावंड यांनी सांगितले. तसेच या टेम्पोचा अज्ञात चालकावर वनविभागाच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून त्या टेम्पोमालकाचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे खैराची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. खैर हा गुटखा बनवण्यासाठी लागत असल्याने बाजारात खैराच्या लाकडाला चांगली किंमत आहे. या कारवाईत जप्त केलेले खैराचे लाकूड मांडवी वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले आहे. (वार्ताहर)