शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

डहाणूतील सायवन भागात पाणीबाणी; विहिरी, नद्या आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:35 AM

डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील सायवन भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा म्हणून हवालदिल झालेल्या जनतेने स्थानिक प्रशासनाला निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. पोकळ आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी पाणीसमस्ये कडे लक्ष देत नाहीत. पाणीपुरवठा प्रश्न न सोडविणारे प्रशासन केवळ निवेदने फक्त स्विकारते का ? असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.सायवन, दाभाडी किन्हवली, सुकटआंबा, दिवशी, शिसने, ओसरविरा, धानिवरी या आदिवासी भागातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक गावपाड्यांत यावर्षी जलसंकट उभे ठाकले आहे. सायवन ग्रामपंचायतिच्या आजूबाजूच्या सुमारे २० गावापड्यात हे संकट अधिकच तीव्र झाले आहे. त्याचा फटका सुमारे साडेपाच हजार लोकवस्तीला बसणार आहे. दाभाडीमधील भावरपडा, फणसोन पाडा, बोरीपाडा, धुळशेत पाडा येथे पाणीटंचाई आहे त्यापैकी भावरपाडा गावातील सुमारे ४५० लोकवस्ती असलेल्या पाड्यातील लोकांना नदीपात्रात खड्डे खोदून पाणी भरावे लागत आहे . सुकट आंबा गावातील बरडीपाडा, पाटीलपाडा, जुणूनपाडा, शिरशेनपाडा तर दिवशीगावातील चामलपाडा, गडदपाडा, चिंचपडा येथील पाड्यामधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पाणी पातळी दीड महिने अगोदरच खालावल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून नदी पात्रात लहानसा पोहरा खोदून लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दूरवरून पाणी आणताना माता भगिनींना दररोज बहुतेक वेळ पाण्यासाठी खर्च करावा लागतो. त्यामुळे कित्येक महिलांना रोजगार बुडवून पाण्यासाठी भटकंती करण्याची कसरत करावी लागते.सायवन परिसरातील पाणीप्रश्नावर डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. भावरपाडा येथे पाण्याचा प्रश्न गंभीर असून टँकरने पाणीपुरवठा करावा. आमच्या गावापासून हाकेच्या अंतरावर धरणे असूनही आम्हाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, हे दुर्दैव आहे. शासनाने त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरु करु न लोकांची तहान भागवावी.- महेंद्र खांडवी, ग्रामपंचायत सदस्यआम्हाला मागील दीड महिन्यापासून पाणी मिळत नाही. नदी लवकर आटल्याने पोहरा खोदूनही जेमतेम पिण्याइतके पाणी मिळते. आमच्या गावासाठी सरकारने पाण्याची सोय करावी.- जया मेढा, महिला ग्रामस्थ, सायवन

टॅग्स :Waterपाणी