शहरं
Join us  
Trending Stories
1
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
2
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
3
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
4
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
5
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
6
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
7
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
8
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
9
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
10
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
11
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
12
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
13
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
14
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
15
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
16
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
17
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
18
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
19
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
20
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...

मुसळधारेने पिवळ्या सोन्यावर पाणी; भातपीक वाया जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:48 IST

अस्मानी संकटामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर 

पारोळ : वसई तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. चांगले पिकलेले आणि हातात येण्याच्या तयारीत असलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच वेधशाळेने १३ ते १७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला होता. दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कापणी केलेल्या व कापणीसाठी तयार असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. 

दरवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात ७६ हजार हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येते. शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा याच भातशेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात रोजगार कमी असल्याने शेतकरी वर्षभर लागणारे भात याच शेतीतून पिकवत असतो, मात्र चालू वर्षी परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातपिकावर पाणी फेरले. 

आधीच कोरोना महामारीमुळे सर्व कामधंदे बंद असताना शेतकरीवर्ग आज फक्त शेतीवर अवलंबून आहे. भातशेती करताना शेतकरी सहकारी सोसायटी, सोने तारण ठेवून शेती कसत असतो. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी महाग असतानाही आपला वर्षभराचा खावटीचा प्रश्न सुटावा यासाठी तो मेहनत करत असतो, पण दोन वर्षांपासून भात कापणीच्या वेळीच परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने हाती आलेले भात पीक वाया जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे. 

या वर्षी भातशेती करणे महाग असतानाही लागवड केली. पण हळवे भात कापणी करताच परतीचा पाऊस सुरू झाल्याने माझ्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करावा. - प्रसाद पाटील, शेतकरी, आडणे

शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या तालुक्यात मागील गेल्या ४-५ दिवसांपासून सायंकाळी धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे जिल्हा परिषद  सदस्य कुसम झोले यांनी  मोखाडा तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी हळव्या भाताची कापणी सुरू आहे, परंतु परतीचा पावसाने भातपिके भिजवली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मोखाड्यात ९० ते १२०  दिवसांत तयार होणाऱ्या हळवार जातीचे भातपीक कापणीसाठी तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कापणीची कामे जोरात सुरू आहेत, परंतु गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भातपीक पुन्हा भिजले.  मागील वर्षीदेखील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्याची अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही तसेच कोरोनाच्या महामारीत शेतकरी गरीब कुटुंबे देशोधडीला लागली असताना पुन्हा वरुणराजाची अवकृपा होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरीRainपाऊस