शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

१७ गावांचा पाणीपुरवठा वीजबिल न भरल्याने बंद, प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 08:55 IST

सफाळेसह येथे एकूण १७ गावे व अनेक पाडे असून तेथे २५ हजारांहून अधिक कुटुंबे आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे चार हजारहून अधिक नळजोडण्या आहेत.

सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळ्यासह १७ गावांमधील अनेक नळजोडणीधारकांना पाणीपुरवठा होत असतानाही पाणीदेयके भरलेली नाहीत. त्यामुळे सफाळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या विजेचे बिल भरू न शकल्यामुळे तीन दिवसांपासून या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.  थकबाकीदार ग्राहकांमुळे  प्रामाणिकपणे पाणीबिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Water supply to 17 villages closed due to non-payment of electricity bills) सफाळेसह येथे एकूण १७ गावे व अनेक पाडे असून तेथे २५ हजारांहून अधिक कुटुंबे आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे चार हजारहून अधिक नळजोडण्या आहेत. परंतु येथील बहुसंख्य जोडणीधारक ग्रामपंचायतीला पाण्याची देयके भरत नसल्याने थकबाकी वाढली आहे. अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाने ग्राहकांना याबाबत सूचना व नोटीस दिल्या. मात्र तरीही थकबाकीदार ग्रामस्थ पाणी देयके भरत नसल्याने सफाळे ग्रामपंचायत वीजबिल भरू शकली नाही. थकीत   वीजबिल न भरल्याने पाणी योजनेचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. थकीत रक्कम भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू करता येणार नाही, अशी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे आता सर्वच नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. सफाळे ग्रामपंचायतीने वीजबिल भरून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अशी आहे योजना या १७ गाव पाणी योजनेचा प्रारंभ सन २००९ मध्ये करण्यात आला. करवाने धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. त्यात उंबरपाडा, सफाळे,  कर्दळ, माकणे, मांडे, विराथन बुद्रूक, जलसार, टेंभी खोडावे, मांजुर्ली, करवाले, नवघर, कांदळवन, वैतीपाडा या गावांचा समावेश आहे. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जि.प. सदस्य, अन्य पदाधिकारी म्हणून पं.स. सदस्य समाविष्ट आहेत.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार