विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट !
By Admin | Updated: May 11, 2017 01:40 IST2017-05-11T01:40:10+5:302017-05-11T01:40:10+5:30
तालुक्यातील गाव पाड्यात पानी टंचाई ची तीव्रता वाढीस लागली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून

विक्रमगड तालुक्यात पाण्याचा खडखडाट !
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : तालुक्यातील गाव पाड्यात पानी टंचाई ची तीव्रता वाढीस लागली असून मे महिन्याच्या प्रखर उन्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून ग्रामीण भागातील महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे मात्र याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे अनेक कूपनलिका बिहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काही भागात विहिरींनी तळ गाठला आहे अनेक कूपनलिका दुरु स्त करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे विहिरी बांधण्याच्या कामामध्ये आवश्यक ती गती नसल्यामुळे ग्रामस्थां मध्ये संतापाचे वातावरण आहे. तालुक्यातील अनेक कूपनलिका नादुरुस्त असल्यामुळे त्याचा फायदा नागरिकांना घेता येत नाही
तालुक्यात फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची स्ुरुवात होते व मे ङ्क्त जूनच्या दरम्यान ती पराकोटीला पोहचते दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. तालुक्यातील तलवाडा - शनवार पाडा, खोरीपाडा, कवडास( खोरीपाडा) केव- पवारपाडा, वसुरी- सहारेपाडा, घानेघर- काचरपाडा व् फरलेपाडा, बास्ते-दिवेपाडा, बास्ते-गावठाण, टेटवाली-कातकरीपाडा,खुडेद-कुडाचापाडा, खुडेद-बिरारीपाडा, केव- भगतपाडा, सांबरेपाडा, आंबिवली- ठाकरेपाडा,विजयनगर, भानपुर- वांगनपाडा, भानपूर-उंबरपाडा या गाव पाड्यात आठ टैंकर ने पाणी पुरवठा चालू आहे. तर खुडेद-घोडीचापाडा, सवादे- कोबाडपाडा, नडगेपाडा, मेघवालेपाडा, साखरे- डोंगरिपाडा, पागीपाडा, आपटी बु. - पहाडपाडा, दांडेकरपाडा, सारशी- तांबडमाळ, खडकी-रिंजडपाडा, केव-रावतेपाडा, शिळशेत- गावठाण, तरेपाडा, केव-सासेआळी, शेलारआळी, सुकसाळे- सुरु मपाडा, या गावपाड्यात टँकर सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एप्रिल महिन्यात प्रस्ताव पाठवून ही ते पडून आहेत. पाणीटंचाई निर्माण होण्यास बोअरवेल नादुरुस्त होणे नव्या विहिरी बांधणे ,त्यासाठी लाभार्थाना योग्यवेळेत निधी उपलब्ध करून न देणे अशी कारणे आहेत.
ही पाणीटंचाई दरवर्षी निर्माण होते. हे प्रशासनाला माहित असतांनाही तिच्या निवरणाचा कोणताही व्यापक आराखडा जिल्हा प्रशासन तयार करीत नाही. साध्या टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना दिले जात नाहीत. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याचे दोन थेंबही गावपाड्यातील नागरिकांना मिळत नाहीत. नवे जिल्हाधिकारी याबाबत तातडीने लक्ष घालतील काय? असा जनतेचा सवाल आहे.