जांभळीचामाळ येथे भीषण टंचाई खड्ड्यांतून भरावे लागते पाणी
By Admin | Updated: April 20, 2017 23:55 IST2017-04-20T23:55:51+5:302017-04-20T23:55:51+5:30
जव्हार शहराला लागून असलेल्या जांभळीचामाळ येथील महिलांना भीषण पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी तासन्तास बोडक्यावर नंबर लाऊन पाण्यासाठी रात्रभर खेपा घालाव्या लागत आहेत.

जांभळीचामाळ येथे भीषण टंचाई खड्ड्यांतून भरावे लागते पाणी
हुसेन मेमन, जव्हार
जव्हार शहराला लागून असलेल्या जांभळीचामाळ येथील महिलांना भीषण पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी तासन्तास बोडक्यावर नंबर लाऊन पाण्यासाठी रात्रभर खेपा घालाव्या लागत आहेत.
जांभळीचामाळ ही ग्रामपंचायत जुनी जव्हार हद्दीत असून तेथे ११० कुटुंबे राहत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळा सुरू झाला की, येथे भीषण पाणीटंचाईला सुरुवात होते. येथे फक्त पाण्यासाठी एकच खड्डा आहे. त्यात लहानशा झऱ्याची बारीक धार आहे. ते पाणी भरण्यासाठी महिलांची येथे रात्रभर गर्दी असते. दरम्यान, जव्हार पंचायत समितीकडून जांभळीचामाळ येथे दिवसाआड टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा आहे. त्यामुळे रात्रंदिन आम्हा पाण्याचा प्रसंग अशी स्थिती आहे.
येथील गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी येथील महिला व नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तो आजही कायम आहे. तासन्तास रांगा लागत असल्याने पाणी भरतांना नेहमीच भांडणे होतात.