शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

पाणीबाणीचे संकट : पालघर जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 23:42 IST

पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पालघर  - पालघर जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेने २३६.९ मिमी पाऊस कमी झाल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या दशकातील हा सर्वात कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील धरणात एक महिनाभर पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा पाणीसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी हा पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास जिल्ह्यात पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊन मोठे जलसंकट निर्माण होऊ शकते.पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात सूर्या मोठा प्रकल्प, मोहखुर्द लघु पाटबंधारे योजना, खांड लघु पाटबंधारे योजना, पालघर तालुक्यात वांद्री मध्यम प्रकल्प मनोर लघु पाटबंधारे योजना, देवखोप लघु पाटबंधारे योजना, माहीम- केळवा लघु पाटबंधारे योजना तर डहाणू तालुक्यात रायतळे लघु पाटबंधारे योजना अशा ८ प्रकल्पांतर्गत प्रकल्पिय पिण्याचा पाणीसाठा, सिंचनक्षमता जिल्ह्यासाठी कार्यान्वित आहे. यातील सूर्या मोठा प्रकल्प, माहीम-केळवे लघु पाटबंधारे योजना व खांड लघुपाटबंधारे योजनेतून जिल्ह्यातील काही तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.जिल्ह्यात सूर्य मोठा प्रकल्प हा विक्र मगड तालुक्यात असून त्याची उपयुक्त क्षमता २८६.३१० दलघमी इतकी असून मृत पाणीसाठा (वापरात नसलेला) १२.७०० दलघमी असा एकूण २९९.०१० दलघमी अशी क्षमता आहे. २३ जून २०१९ पर्यंत यात ५२.०१५ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी १८.८४ टक्के इतकी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ४४.५२ दलघमी इतका कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या प्रकल्पांतर्गत वसई, विरार, टीएपीएस, बीएआरसी, बाडा पोखरण डहाणू, पालघर २७ गावे आदींना पाणीपुरवठा केला जात असून त्यांची दररोज सुमारे ०.२० दलघमी एवढी पाण्याची मागणी आहे. मात्र या प्रकल्पातून सिंचनासाठीही पाणी दिले जात असल्याने त्यांची संपूर्ण मागणी पूर्ण करता येत नाही.माहीम केळवा लघुपाटबंधारे योजनेअंतर्गत धरणातून पालघर तालुक्यातील केळवे रोड, आगरवाडी, नगावे, विळगी वेंगनी, तिघरे, दांडा -खटाळी, भादवे, मथाने, एडवन, कोरे, खर्डी, दातिवरे आदी भागात पाणीपुरवठा केला जात असून या प्रकल्पाची वापरता येण्याजोगा पाणीसाठा क्षमता ३.२४३ दलघमी इतका असून वापरता न येण्या जोगा (मृत) पाणीसाठा ०.१५६ दलघमी असा एकूण ३.३९९ दलघमी इतका पाणीसाठा क्षमता आहे. सोमवारी (२३ जून)पर्यंत या धरणात ०.९३४ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून मागच्या वर्षाच्या तुलनेने ०.१८६ इतका कमी आहे. तरीही एक महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता आर.आर.पाध्ये यांनी सांगितले. खांड लघु पाटबंधारे योजनेतर्गत विक्र मगड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून या धरणाची क्षमता ४.५०० दलघमी इतकी आहे. यातील वापरता न येण्याजोगा मृत पाणीसाठा ०.२६० दलघमी इतका असून एकूण ४.७६० दलघमी इतकी साठवणूक क्षमता आहे. या धरणात सध्या ०.४०८ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ०.०४४ दलघमी इतका अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.तरच जव्हारला प्यायला पाणीजव्हारला जयसागर डॅममधून पाणीपुरवठा केला जात असून यामधील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने जव्हारकरांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. त्यांची सारी भिस्त पावसावर अवलंबून असल्याने त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारwater scarcityपाणी टंचाई