गोखिवरे येथे दोघांचा भिंत कोसळून मृत्यू

By Admin | Updated: July 3, 2016 03:00 IST2016-07-03T03:00:36+5:302016-07-03T03:00:36+5:30

काल रात्री वसई पूर्वेकडील गोखीवरे येथील एका पडक्या घराची भिंत कोसळून दोन तरुण जागीच मृत झाले. तर शनिवारी सकाळी नालासोपाऱ्यात शाळकरी मुलगी शॉक लागून जागीच

The wall of both walls collapsed at Gokhovre | गोखिवरे येथे दोघांचा भिंत कोसळून मृत्यू

गोखिवरे येथे दोघांचा भिंत कोसळून मृत्यू

वसई : काल रात्री वसई पूर्वेकडील गोखीवरे येथील एका पडक्या घराची भिंत कोसळून दोन तरुण जागीच मृत झाले. तर शनिवारी सकाळी नालासोपाऱ्यात शाळकरी मुलगी शॉक लागून जागीच मृत झाली.
गोखीवरे फादरवाडीत राहणारे सनी रावत (२२) आणि स्वप्नील सावंत (२१) काल रात्री आपल्या घरी जात असताना रस्त्यालगत असलेल्या एका पडक्या घराची भिंत त्यांच्या अंगावर पडली. त्यात दबून दोघांचाही मृत्यू झाला. या घरात कुणीही रहात नव्हते. पावसामुळे घराच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या.
सकाळी नालासोपारा पूर्वेकडील गांगरी पाडा येथील एस. के. स्कूलजवळ असलेल्या एका विजेच्या खांबाला हात लागताच पायल उपाध्याय (१०) ही शाळकरी मुलगी शॉक लागून जागीच मृत झाली. पायल शाळेत जायला निघाली होती. जाताना तिचा रस्त्याकडेला असलेल्या विजेच्या खांबाला हात लागला. लोखंडी खांब्यातून वीजेचा प्रवाह वहात होता. त्यामुळे शॉक लागून पायलचा जागीच मृत्यू झाला.
(प्रतिनिधी)

Web Title: The wall of both walls collapsed at Gokhovre