शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

घराची प्रतीक्षा १९९८ पासून; पुष्पातार्इ यांच्याशी लता मंगेशकर पुरस्कारानिमित्त संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 5:46 AM

‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना आपल्या सुरेल गीतांनी अजरामर करणा-या सातपाटीच्या गायिका पुष्पा पागधरे ह्यांना शासनाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्या कुटुंबियांसह गावकºयां मध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- हितेन नाईक ।पालघर : ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थना आपल्या सुरेल गीतांनी अजरामर करणाºया सातपाटीच्या गायिका पुष्पा पागधरे ह्यांना शासनाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर ह्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांच्या कुटुंबियांसह गावकºयां मध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, त्यांना शासनाचा पुरस्कार मिळाला असला तरी कलाकारांच्या कोट्यातून १९९८ साली मागितलेले घर अजूनही मिळाले नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.तालुक्यातील सातपाटी गावातील गायक जनार्दन चामरे ह्यांच्या पुष्पा ताई ह्या कन्या. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच त्यांना आपल्या घरातूनच संगीताचे बाळकडू मिळाले. आवाज गोड असल्याने गायनातील बारकावे शिकावेत म्हणून त्यांना सातपाटी मत्स्यव्यवसाय माध्यमिक शाळेतील ग्राफ इन्स्ट्रक्चर शिकविणारे तसेच हार्मोनियम आणि तबल्यावर प्रभुत्व असलेल्या आर. डी. बेंद्रे सरांकडे संगीताचे धडे घेण्यासाठी दाखल केले गेले.१९५५ च्या दरम्यान सातपाटी गावामध्ये श्रीराम प्रासादिक मंडळ, जयहिंद नाट्य मंडळ आणि न्यू उदय नाट्य मंडळ अशी तीन नाट्य मंडळ होती. ह्यातील काही नाट्य प्रयोगातील गाण्यांना त्यांनी आपला आवाज द्यायला सुरु वात केली. राम प्रासादिक मंडळातील नाट्य अभिनेते व हार्मोनियम वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रकांत सोवार पागधरे ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. खारेकुरण येथील एक आदर्श शिक्षक भिकाजी बुधाजी नाईक हे सेवानिवृत्त झाल्या प्रित्यर्थ एका कार्यक्र मात मुंबईचे तत्कालीन महापौर वासुदेव वरळीकर पाहुणे म्हणून आले असताना पुष्पा ताईने गायलेल्या ‘जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला’ हे लता दीदी च्या आवाजातील गाणे ऐकल्या नंतर ते प्रभावित झाले. त्यांनी त्यांना मुंबईत येण्याचे आमंत्रण दिले. पुढे वसंत देसाई, राम कदम ह्या संगीतकारा पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास महंमद रफी ह्यांच्या सोबत गायलेल्या ‘अग पोरी संभाल दर्याला तुफान आयलय भारी, इत्यादी मराठी, हिंदी, भोजपुरी, बंगाली, पंजाबी, गुजराती इ.अनेक भाषांतील चित्रपटात गाणी गात सुरू राहिला. मात्र अंकुश चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता,मन का विश्वास कमजोर होना’ ह्या गाण्याने त्याना चित्रपट सृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख मिळवून दिली.