वाडा : कुडूस नाक्यावरील अतिक्रमणे सा.बां.ने हटविली
By Admin | Updated: January 8, 2016 01:58 IST2016-01-08T01:58:49+5:302016-01-08T01:58:49+5:30
कुडुस नाक्यावर दुतर्फा हातगाड्या, टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्या विरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी आल्या

वाडा : कुडूस नाक्यावरील अतिक्रमणे सा.बां.ने हटविली
वाडा : कुडुस नाक्यावर दुतर्फा हातगाड्या, टपऱ्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्या विरोधात नागरिकांच्या वारंवार तक्रारी आल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहीम घेऊन अतिक्रमणे हटविल्याने आता वाहतूक कोंडी फुटली आहे.
वाडा तालुक्यातील कुडुस नाक्यावर दुतर्फा टपऱ्या असल्याने येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत होती. त्यातच दुकानदानीही दुकाने आणखी वाढविल्याने एकूणच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होत नव्हती.
या विरोधात नागरिकांच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या होत्या. त्या अनुषंगाने सा. बा. वि. ने कायदेशीर नोटीसा पंधरा दिवसापूर्वी दिल्या होत्या. मात्र टपऱ्या हटविण्यात आल्या नव्हत्या. आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी, ट्रक व कर्मचारी घेऊन आल्याने काही दुकानदारांनी स्वताहून टपऱ्या हटवल्या तर काहींच्या टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हटविल्या . वाहतूक कोंडीच्या समस्येपासून मुक्त केल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत संख्ये यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता सतिष मराडे, प्रकाश शेटे व कर्मचाऱ्यांनी केली.