विवेकची वृक्षसंवर्धन दत्तक योजना अभिनव
By Admin | Updated: May 12, 2017 01:22 IST2017-05-12T01:22:48+5:302017-05-12T01:22:48+5:30
पर्यावरणाचे महत्व पटवून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी विवेक रु रल डेव्हलपमेंट सेंटर संचालित राष्ट्र सेवा समितीने वृक्ष संवर्धन दत्तक योजना

विवेकची वृक्षसंवर्धन दत्तक योजना अभिनव
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : पर्यावरणाचे महत्व पटवून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी विवेक रु रल डेव्हलपमेंट सेंटर संचालित राष्ट्र सेवा समितीने वृक्ष संवर्धन दत्तक योजना हाती घेतली आहे. या नुसार एक हजार झाडांची लागवड आणि संगोपन करण्यात येणार आहे.
मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील भालिवली येथे विवेकने गाव केंद्राची स्थापना केली आहे. याद्वारे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, स्वावलंबन आदी मार्गाने काम केले जात आहे. तसेच त्यांना आधुनिक शेती करण्याचे मार्गदर्शन, पाणी टंचाई टाळून बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शेततळे, वाहत ओढ्यांची खोली वाढवून त्यात चर खणणे अशी कामी गाव विकास केंद्राने केली आहेत. त्यामुळे हा परिसर स्वंरोजगार, प्राथिमक शिक्षण, प्रशिक्षण, शेती, बांबू प्रशिक्षण, खत, दुध-तुप, गोमुत्रापासून निरनिराळी औषध निर्मिती ती अशा क्षेत्रात क्र ांती करु लागला आहे.
या केंद्राने वृक्ष संवर्धन दत्तक योजना हाती घेतली आहे. वनखात्याच्या अडीज एकर जागेवर ५०० आणि विद्यार्थ्यांमार्फत पाड्यांमध्ये ५०० झाडे लावण्याचा उपक्र म पुर्ण केला आहे. ही झाडे जगावीत, त्यांचे संगोपन व्हावे यासाठी एका मजुराची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा पगार आणि लागणारा खर्च काढणसाठी झाडे दत्तक घेण्याची योजना केंद्राने अंमलात आणली.