आकेगव्हानच्या महालक्ष्मीची यात्रा
By Admin | Updated: April 1, 2016 03:13 IST2016-04-01T03:13:35+5:302016-04-01T03:13:35+5:30
कासा परिसरातील आकेगव्हान येथील यात्रेला सुरूवात झाली आहे. २८ मार्च पासून सदर यात्रा सुरू झाली असून सतत दहा दिवस चालणाऱ्या यात्रेता भाविकांची गर्दी वाढणार

आकेगव्हानच्या महालक्ष्मीची यात्रा
- शशिकांत ठाकूर, कासा
कासा परिसरातील आकेगव्हान येथील यात्रेला सुरूवात झाली आहे. २८ मार्च पासून सदर यात्रा सुरू झाली असून सतत दहा दिवस चालणाऱ्या यात्रेता भाविकांची गर्दी वाढणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पालघर तालुक्यातील नानीवली जवळ आकेगव्हान येथे महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. गेल्या चार वर्षापासून येथे दहा दिवसाची यात्रा भरते. दरवर्षी रंगपंचमी पासून होम हवन पुजा करून यात्रेला सुरूवात होते. सदर मंदिरात महालक्ष्मी, कालिका, सरस्वती व रेणुका मातेच्या पांडवकालीन मुर्त्या आहेत. सदर ठिकाणी पुर्वी लाकडी व कौलारू मंदिर होते. परंतु खूप वर्षाचा कालावधी व वेळोवेळी दुरूस्ती अभावी मंदिर कोलमडून गेले होते. या ठिकाणी पूर्वी यात्रा व विविध देवीचे उत्सव स्थानिक पातळीवर साजरे केले जात होते परंतु मंदिराच्या दुरावस्थेमुळे सदर उत्सव बंद पडले होते. ही देवी जागृत असल्याचे मानले जाते. दरम्यान, गेल्या चार वर्षापुर्वी परिसरातील दानशुर व्यक्ती व भक्तांनी एकत्र येवून मंदिराचा जिर्णोद्धार व मंदिर उभारणीसाठी मंडळ स्थापन करून मंदिर उभारणीसाठी दानशुर व्यक्तीच्या मदतीने निधी गोळा केला व सदर ठिकाणी नव्याने मंदिराच्या कामास सुरूवात केली व मागील वर्षी मंदिर बांधून पूर्ण करण्यात आले व इतर कामे सुरू आहेत. आणि चार वर्षापासून यात्रा उत्सवही सुरू करण्यात आला आहे. सदर मंदिर सुर्यानदीच्या जवळ असल्याने भाविकांच्या सोईसुविधासाठी मुबलक पाणी आहे. गेल्या दोन दिवसापासून परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असून विविध करमणूक वस्तु, खेळ व प्रदर्शने यात्रेत मांडली आहेत.