विरारच्या बिल्डरला २० हजारांचा दंड

By Admin | Updated: February 28, 2016 04:05 IST2016-02-28T04:05:30+5:302016-02-28T04:05:30+5:30

भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड करून न देणाऱ्या आणि सोसायटीला कराराप्रमाणे इतरही सेवा न देणाऱ्या विरारच्या साईराज डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २०

Virar's builder gets 20 thousand penalty | विरारच्या बिल्डरला २० हजारांचा दंड

विरारच्या बिल्डरला २० हजारांचा दंड

ठाणे : भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड करून न देणाऱ्या आणि सोसायटीला कराराप्रमाणे इतरही सेवा न देणाऱ्या विरारच्या साईराज डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २० हजारांचा दंड ठोठावला आहे.
विरार येथील वज्रेश्वरी गृहनिर्माण संस्थेच्या सदनिकाधारकांनी साईराज डेव्हलपर्सकडून फ्लॅट खरेदी केले होते. त्यानंतर, गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत करण्याची जबाबदारी डेव्हलपर्स यांची होती. मात्र, त्यांनी ती न केल्याने सदनिकाधारकांनी स्वत:च संस्था नोंदणीकृत करून घेतली. तसेच त्यानंतर इमारतीच्या जागेचा कन्व्हेअन्स करून देण्यासाठी गृहनिर्माण संस्थेने डेव्हलपर्सला वारंवार सांगितले होते. त्यासाठी कायदेशीर नोटीसही पाठवली होती. मात्र, त्यांनी तोही करून दिला नाही.
कराराप्रमाणे साईराज डेव्हलपर्सने गृहनिर्माण संस्थेला सेवा न दिल्याने ग्राहक मंचाने त्यांना २० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच वज्रेश्वरी गृहनिर्माण संस्थेच्या नावे त्या भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड करून द्यावे, असे आदेशही दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Virar's builder gets 20 thousand penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.