शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
4
अमेरिकेने केली इराणची कोंडी, इराणला चारही बाजूंनी अमेरिकेने घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ
5
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
7
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
8
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
9
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
10
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
11
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
12
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
13
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
14
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
15
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
16
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
17
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
18
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
19
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
20
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विरारमधून संपूर्ण कुटुंब गायब, सुनेची पोलिसांत तक्रार, सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:17 IST

विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणा-या त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

- शशी करपेवसई : विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणाºया त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही.विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमध्ये शर्मा कुटुंब राहते. सुरेंद्र शर्मा (५०), पत्नी अनिता शर्मा, वरुण शर्मा (२७), अश्विनी शर्मा (३४), प्रियंका शर्मा (१६), मालती शर्मा (५२) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. वरुणची पत्नी संगीता शर्मा बाळंतपणासाठी माहेरी अमरावती येथे गेल्या आहेत. १५ जूनला संगीताला मुलगी झाली. त्यानंतर वरुण १५ दिवस अमरावतीला राहिला होता. आॅगस्टमध्ये वरुणचे वडील सतीशचंद्र शर्मा यांचे निधन झाले होते. त्यानंतर वरुण आॅक्टोबर महिन्यात अमरावतीला जाऊन संगीता आणि मुलीला भेटूनही आला होता. १४ आॅक्टोबरला संगीता आणि वरुण यांच्यात मोबाइलवर शेवटचे बोलणे झाले होते. वरुणचा संपर्क होत नसल्याने संगीता शर्मा यांनी वरुणचे काका सुरेंद्र शर्मा यांना फोन केला असता थोड्या वेळाने फोन करतो असे उत्तर त्यांनी दिले होते. तेव्हापासून सर्वांचेच मोबाइल बंद झाले होते.धास्तावलेल्या संगीता शर्मा यांनी गुगलवरून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शर्मा यांच्या घरी धाव घेतली असता त्यांचे घर बंद आढळून आले. पोलिसांनी शेजाºयांकडे चौकशी केली तेव्हा काही दिवस नाशिकला जात आहोत, असे शर्मा कुटुंबाने त्यांना सांगितल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही फूटेज तपासले आहे. १५ आॅक्टोबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास सहा जण एका भाड्याच्या कारमध्ये सामान टाकून बसून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.मोबाइल लोकेशन मिळणेही कठीणपोलिसांनी शर्मा कुुटुंबीयांचे मोबाइल लोकेशन तपासले तेव्हा पहिल्यांदा नाशिक दाखवले गेले. त्यानंतर सुरत लोकेशन मिळाले. पण, नंतर सर्वांचेच मोबाइल बंद असल्याने लोकेशन मिळणेही कठीण होऊन बसले आहे. अर्नाळा पोलिसांनी शर्मा कुुटुंबीयांच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. कर्ज, आर्थिक व्यवहार किंवा कौटुंबिक कलह आहे किंवा काय यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार