शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विरार-डहाणू रेल्वेचा होणार कायापालट

By admin | Updated: January 26, 2017 02:55 IST

पश्चिम रेल्वेच्या 3 हजार ५५२ कोटी खर्चाच्या एमयूटीपी ३ प्रकल्पांतर्गत विरार-डहाणू दरम्यान येत्या चार पाच वर्षात चौपदीकरणाद्वारे मोठे जाळे उभारले

हितेन नाईक / पालघरपश्चिम रेल्वेच्या 3 हजार ५५२ कोटी खर्चाच्या एमयूटीपी ३ प्रकल्पांतर्गत विरार-डहाणू दरम्यान येत्या चार पाच वर्षात चौपदीकरणाद्वारे मोठे जाळे उभारले जाणार असून या रेल्वेचा कायापालट होणार आहे. यावेळी सद्यस्थितीतील रेल्वे ट्रॅकच्या पूर्वेकडून मालवाहतूक प्रकल्प तर पश्चिमेकडून चौपदीकरण होणार असल्याने त्या आड येणाऱ्या पालघर ते वाणगाव दरम्यानच्या स्टेशनाजवळील रेल्वेच्या अनेक जुन्या, नवीन इमारती जमीनदोस्त होणार आहेत.एमयूटीपी अंतर्गत विविध प्रकल्पात मंजुरी मिळाल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आल्यानंतर एमयूटीपी ३ अंतर्गत विरार डहाणू चौपदीकरण करण्यासंबंधीचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यासाठी एका खाजगी कंपनीला ह्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार या कंपनीने विरार ते डहाणू दरम्यानच्या प्रवाशांची (अप-डाऊन) सध्याची संख्या व त्यात पुढील ३० वर्षात होणारी वाढ, या विविध भागात होणारे शहरीकरण, औद्योगिकरण याचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. या प्रकल्पातंर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करतांना विरार-डहाणू दरम्यानच्या प्रवाशांसाठी सन २०२१ पर्यंत दर १२ मिनिटाला एक लोकल अशी सेवा उपलब्ध राहणार आहे. सन २०३१ मध्ये ६ मिनिटाला एक लोकल, सन २०१४ मध्ये दर ४ मिनिटाला एक लोकल प्रवाशाच्या दिमतीला देण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. याच वेळी ९० हजार कोटी खर्चाची मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही याच मार्गावरून धावणार आहे. प्रवाशांना जादा लोकलच्या फेऱ्या बरोबरच वैतरणा-डहाणू दरम्यानच्या ९ स्थानकांच्या जोडीला वाढीव, सरतोंडी, माकूणसार, चिंतूपाडा, खराळे रोड, पंचाळी, वंजारवाडा, बीएसई एस कॉलनी अशी आठ नवीन स्थानके निर्माण करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ६४ किलोमीटरच्या या पट्ट्यात नवनवीन गृहसंकुले औद्योगिक प्रकल्प, पालघर जिल्हा कार्यालये उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने ही नवीन स्थानके कुठे असावीत हेही सुचविण्यात आली आहेत, असे जरी असले तरी ही स्थानके उभारण्यासाठीचा खर्च मात्र या प्रकल्पांत अंतर्भूत नाही. स्टेशन परिसरात करण्यात येणाऱ्या बदला बाबत सन २०१२ साली रेल्वे प्रशासनाने नेमलेल्या समितीद्वारा विरार ते डहाणू दरम्यानच्या परिस्थिीतीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)