खेड्यांत सर्रास वीजचोरी

By Admin | Updated: August 12, 2015 23:14 IST2015-08-12T23:14:38+5:302015-08-12T23:14:38+5:30

जव्हार तालुक्यातील काही खेड्यापाड्यांत सर्रास मेनलाइनवर आकडे टाकून विजेचीचोरी केली जाते आहे. मात्र, महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही

The village's general electricity bill | खेड्यांत सर्रास वीजचोरी

खेड्यांत सर्रास वीजचोरी

जव्हार : जव्हार तालुक्यातील काही खेड्यापाड्यांत सर्रास मेनलाइनवर आकडे टाकून विजेचीचोरी केली जाते आहे. मात्र, महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. याचे परिणाम लोडशेडिंगच्या रूपात बघावयास मिळतात. खेड्यापाड्यांत ६ ते ८ तास भारनियमन केले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे सायंकाळच्या वेळेस आकडे लावून विद्युतपुरवठा सुरू करून होत असलेली वीजचोरी हे आहे.
वितरण विभाग डबघाईस आला असताना अशा वीजचोऱ्यांमुळे महावितरण विभागाचे मोठे नुकसान होत आहे. तरीही, अशा घटनांकडे महावितरणचा एकही अधिकारी लक्ष देता नाहीत कारण त्यांचे या वीजचोरांशी साटेलोटे असावे अशी ही चर्चा आहे.
(वार्ताहर)

Web Title: The village's general electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.