कामण पूर्व देवकुंडी नदीच्या पात्रात अडकलेल्या 15 पर्यटकांची गावकऱ्यांनी केली सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:23 AM2020-07-13T00:23:35+5:302020-07-13T00:24:11+5:30

देवकुंडी नदी ठिकाणी रविवारी दुपारच्या सुमारास गावातील स्थानिकांना हा प्रकार दिसून आला.

Villagers rescue 15 tourists stranded in Kaman East Devkundi river! | कामण पूर्व देवकुंडी नदीच्या पात्रात अडकलेल्या 15 पर्यटकांची गावकऱ्यांनी केली सुटका!

कामण पूर्व देवकुंडी नदीच्या पात्रात अडकलेल्या 15 पर्यटकांची गावकऱ्यांनी केली सुटका!

Next

- आशिष राणे

वसई : पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील काळमांडवी धबधब्यावर घडलेली दुर्दैवी घटना ताजी असताना वसई पूर्व कामण येथील देवकुंडी नदी पात्रा ठिकाणी वसईतीलच एक 15 पर्यटकांचा चमू मौजमस्ती करायला गेला असता अचानकपणे आलेल्या नदीच्या प्रवाहामुळे त्यापैकी काही पर्यटक अडकले असता त्यांची  गावकऱ्यांनी  सुखरूप सुटका केल्याची घटना रविवार दुपारी घडल्याचे उघडकीस आले आहे.

देवकुंडी नदी ठिकाणी रविवारी दुपारच्या सुमारास गावातील स्थानिकांना हा प्रकार दिसून आला. याबाबतची माहिती स्थानिकांनी दिली. देवकुंडी नदी ठिकाणी रविवारी वसईतीलच काही 15 जण तरुण यात 3 ते 4 तरूणीचा देखील समावेश आहे. ही सर्व मित्रमंडळी याठिकाणी नदीच्या पात्रात डाव्या व उजव्या बाजूला मौजमजा करत असताना अचानकपणे दुपारी नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा प्रवाह आला व एकच गोंधळ उडाला. मात्र, यातील तरुण तरुणी यांच्याजवळ मोबाईल होते. परंतू नेटवर्क नसल्याने पोलीस किंवा अग्निशमन दलाला मदतीसाठी बोलवता आले नाही.

अखेर गावकऱ्यांना ही घटना समजल्यावर त्यांनी तात्काळ दोरीच्या सहा य्याने सर्वांची किनाऱ्यावर आणून सुखरूप सुटका केली. एकूणच कोरोना संक्रमण सुरू आहे त्यात सध्या पावसाळा सुरू असल्याने कामण भागातील देवकुंडी परिसरात असलेल्या नदीला धबधब्याचे स्वरूप आले आहे. या नदीच्या ठिकाणी मौजमजा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मुख्य म्हणजे पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळी बंदी घातली असताना देखील बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याने अशा दुर्घटना घडतात. यासाठी तरुणांनी सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Web Title: Villagers rescue 15 tourists stranded in Kaman East Devkundi river!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.